By : Polticalface Team ,
पेट्रोल डिझेलचे दिवसेंदिवस गगनाला भिडणारे भाव पाहता इलेक्ट्रिक वाहने ही काळाची गरज होणार आहे, हे काही आता वेगळे सांगायला नको.इंधनाचे वाढते भाव हे जसे इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला चालना देतात तसेच त्याचे इतर कोणते फायदे आहेत ते आपण पुढे बघू मेंटनन्स कमी लागतो: यात इंधनाचा वापर होत नसल्याने मेकॅनिकल पार्ट्स कमी असतात, त्यामुळे पेट्रोल किंवा डिझेल वाहनांच्या तुलनेत इलेक्ट्रिक वाहनांचा मेंटनन्स ठेवण्याचा खर्च कमी येतो. इलेक्ट्रिक वाहनांमध्ये ज्या प्रकारच्या मोटार वापरल्या जातात त्याने ध्वनी प्रदूषण कमी व्हायला मदत होते.या गाड्या सुरू होताना सुद्धा आवाज होत नाही .इलेक्ट्रिक वाहनांचा सर्वात महत्त्वाचा आणि दूरगामी फायदा हा प्रदूषण मुक्त वातावरणासाठी होतो.
या वाहनांच्या वापराने आपल्या भोवतालच्या परिसरातील प्रदूषण नियंत्रित ठेवणे शक्य होऊ शकते. घरातूनच चर्जिंग शक्य: भारतातील सर्व इलेक्ट्रिक बाईक कम्पन्या बाईक बरोबर घरी चर्जिंग ची सुविधा सुद्धा देतात. त्याशिवाय शहरात ठिकठिकाणी चर्जिंग स्टेशन सुरू करण्यावर सुद्धा सरकारचा विचार चालू आहे.या बाईक,कार सामान्य सॉकेट हुन ३ ते ४ तासात चर्जिंग करणे सहज शक्य होते. रनिंग कॉस्ट: पेट्रोल डिझेल वाहनांपेक्षा या वाहनांचा प्रति किलोमीटर खर्च कमी होतो.यामुळे येणारा खर्च हा 40पैसे प्रतिकिलोमीटर पेक्षाही कमी येतो. पेट्रोल च्या तुलनेत 95% बचत यातून शक्य होऊ शकते. सरकारी मदत: इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवा म्हणून सरकरकडूनही काही सवलती, सबसिडी दिल्या जातात यावेळी एक मुफ्त दंत तपासणी देखिल ठेवली होती ग्राहकांनी दिलेल्या प्रचंड प्रतिसाद बद्दल ओकीनावा अहमदनगर संचालक श्री अनमोल कटारिया यांनी सर्वांचे आभार मानले वाचक क्रमांक :