महेश्वर पतसंस्था अन् नगर अर्बन बँकेच्या गोंधळात शेतकर्‍याला दीड कोटीची नोटीस

By : Polticalface Team ,Fri Sep 16 2022 16:39:35 GMT+0530 (India Standard Time)

महेश्वर पतसंस्था अन् नगर अर्बन बँकेच्या गोंधळात शेतकर्‍याला दीड कोटीची नोटीस काष्टी वार्ताहरः श्रीगोंदा तालुक्यातील सांगवी दुमाला येथील शेतकरी केशव मोहन भोयटे यांच्या नगर अर्बन को.आॕ.बॕकेत पॕनकार्डचा गैरवापर करुण महेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेने सुमारे ७ कोटी ८१ लाख ४९ हजार ६७० रुपयेचा गैव्यवहार केल्याने सदर शेतकऱ्यांला त्याच्या सीए कडून १८ टक्के म्हणजे १ कोटी ४० लाख ६६ हजार रुपये कर भरण्याची माहिती आल्याने शेतकरी अडचणी येवून त्याची ९१ हजार ६०० रुपयेची कर्जमाफी रद्द झाली आहे.

सविस्तर माहिती अशी कि तालुक्यातील भिमानदी काठी सागंवी दुमाला येथील रहिवासी असलेल्या केशव भोयटे या शेतकऱ्यांच्या नावे ४६ आर जमीन होती त्याला २०१८-१९ मध्ये महाराष्ट्र शासनाची पिक कर्जावरील ९१ हजार ६०० रुपयेची मिळालेली कर्जमाफी रद्द झाली आणि केशव भोयटे यांना त्याच्याकडून माहिती दिली गेली कि आपण आपल्या काष्टी ता.श्रीगोंदा येथील नगर अर्बन को.आॕ.बॕक काष्टी शाखेतून म्हणजे भोयटे यांच्या खाते नंबर ०००९१८ वरुण (AUJPB2107J ) पॕनकार्डच्या आधारे सुमारे ७ कोटी ८१ लाख ४९ हजार ६७० रुपयेचे व्यवहार करुण आपण शासनाचा कर बुडविला आहे.त्यामुळे तुम्हाला १८ टक्याने १ कोटी ४० लाख ६६ हजार रुपये (आयटी रिटर्न) कर भरावा लागेल. या नोटीशीचा भोयटे यांना मोठा धक्का बसला व मानसिक त्रास झाला. आपल्याला फक्त ४६ आर जमीन असताना आपल्या नावे इतका मोठा गैव्यवहार झाला कसा, यावर भोयटे यांनी सदर व्यवहाराची नगर अर्बन बॕकेच्या काष्टी शाखेत चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली काष्टी शाखेतील नगर अर्बन बॕकेत केशव भोयटे याच्या पॕनकार्डचा गैरवापर करुण येथील महेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेने त्याचे चालु खाते नंबर ०००३३८ कस्टमर नंबर १७५८२६३ वरून सर्व व्यवहार केले असल्याचे निदर्शनास आले आहे. सदर व्यवहारामुळे भोयटे यांना मानसिक त्रास होवून त्यांना महाराष्ट्र शासनाची २०१८-१९ मध्ये मिळणारी ९१ हजार६०० रुपयेची कर्जमाफी रद्द झाली. याला जबाबदार कोण

या संदर्भात भोयटे यांनी बॕकेला विचारणा केली असता बॕकेच्या शाखा अधिकारी यांनी भोयटे यांना लेखी पत्र देवून यामध्ये आमची चूक झाली आहे यामध्ये सर्व व्यवहार महेश्वर पतसंस्थेचे झालेले आहेत. केशव भोयटे याचा यामध्ये कोणत्याही प्रकारचा दोष नाही. फक्त आमच्या बॕकेत महेश्वर संस्थेचे झालेले व्यवहार भोयटे यांच्या पॕन नंबर वरती दिसत आहेत असे उत्तर बॕकेकडून मिळाले .पण भोयटे यांच्या खात्यावर सुमारे ८ कोटीचे व्यवहार झाल्याने त्याचे १ कोटी ४० लाख ६६ हजार रुपये शासनाचा बुडविलेला कर भरायचा कोणी हा भोयटे यांच्यापुढे मोठा प्रश्न आहे.

महेश्वर पतसंस्थेचे अध्यक्ष,उपाध्यक्ष, संचालक व नगर अर्बन बॕकेचे काष्टी शाखेतील अधिकारी व कर्मचारी यांनी संगनमताने माझ्या बॕकेतील व संस्थेमधील खात्यामध्ये पॕनकार्ड नंबरचा गैरवापर करुण मोठा आर्थिक व्यवहार केल्याने त्याच्यावर रितसर गुन्हा दाखल करावा या संदर्भात केशव भोयटे यांनी जिल्हा पोलिस अधिक्षक ,पोलिस निरिक्षक श्रीगोंदा, सहाय्यक निबंधक, डी.डी.आर तसेच महेश्वर पतसंस्था व नगर अर्बन बॕक यांना लेखी निवेदन दिले असुन यावर अजुन कोणत्याही प्रकारची दखल प्रशासनाने घेतली नसल्याने लवकरच मी कोणत्याही प्रकारची पूर्व सुचना न देता शासकीय कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचे भोयटे यांनी सांगितले.


महेश्वरचे बॕकेत आणखी किती घोटाळे आहेत ? नगर अर्बन बॕकेत या अगोदर मोठे आर्थिक गैरव्यवहार झाल्याने बॕकेवर प्रशासक नेमलेले असताना आता काष्टी शाखेतील बॕकेत नगर अर्बन बॕक यांनी आणखी काही संस्थाना उद्योजकांना व व्यापाऱ्यांना बरोबर घेऊन त्याच्याशी संगनमत करुण आणखी काही गैरव्यवहार केले का ? याची सखोल चौकशी झाली पाहिजे. केशव भोयटे शेतकरी सांगवी दुमाला.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.