पीक विम्याच्या मागणीसाठी आष्टी तहसील कार्यालयासमोर मनसेचे निदर्शने.तहसीलदार यांना दिले विविध मागण्यांचे निवेदन

By : Polticalface Team ,Fri Sep 16 2022 16:52:57 GMT+0530 (India Standard Time)

पीक विम्याच्या मागणीसाठी आष्टी तहसील कार्यालयासमोर मनसेचे निदर्शने.तहसीलदार यांना दिले विविध मागण्यांचे निवेदन 
आष्टी। प्रतिनिधी सरसकट शेतकऱ्यांना पिक विमा देण्यात यावा या मागणीसाठी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष दिपक उंबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आष्टी येथील तहसील कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आले. आष्टी तालुक्यातील मनसेच्या वतीने बुधवार दि १४ सप्टेबर रोजी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालयासमोर जोरदार घोषणेच्या आतीष बाजीने निदर्शने केले.यावेळी नायब तहसीलदार बाळदत्त मोरे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष दिपक उंबरकर यांनी निवेदनात असे नमूद केले की,बीड जिल्ह्यातील सोयाबीन पिकासह विमा लागू असलेल्या विविध पिकांचे रॅन्डम पद्धतीने सर्वेक्षण करून जिल्ह्यातील ६३ पैकी १६ महसुली मंडळांमधील सोयाबीन पिकासह विमा धारक शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रीम पीकविमा मंजूर करण्यात आला असून सोयाबीनसह मागील तीन महिन्यात कमी अधिक पावसाने व किडींच्या प्रादुर्भावाने बाधित झालेल्या व पिकविमा लागू असलेल्या कापूस, तूर, मुग, उडीद आदी सर्वच पिकांना सर्व महसूल मंडळांमध्ये पीकविमा मंजूर करण्यात यावा.तसेच जून, जुलै व ऑगस्ट या तीन महिन्यांत बीड जिल्ह्यात सर्वदूर काही निवडक गावे वगळता पावसाने महिनाभर उघड दिली होती. या काळात ऐन जोमात आलेली पिके करपून गेली आहेत. बहुतांश भागांत अजूनही पाऊस नाही. जिल्ह्यातील ६३ महसुली मंडळांमध्ये मागील तीन महिन्यांत वेगवेगळ्या स्वरुपात नुकसान झाले आहे.

जिल्ह्यात त्यांतल्या काही आष्टी तालुक्यात पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यामुळे उत्पादनात ५० टक्क्यांपेक्षा अधिक घट येणार आहे.मात्र, जिल्हा प्रशासन व संबंधित विमा कंपनीने सर्वेक्षणाच्या नावावर घातलेला घोळ अक्षम्य असून शेतकन्यांमध्ये प्रचंय असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्य सरकारने जिल्हा प्रशासन व संबंधित विमा कंपनीला आवश्यकता असल्यास तातडीने पुन्हा फेर सर्वेक्षण करावे व सर्व ६३ महसुली मंडळांमधील सोयाबीनसह कापूस, तूर, मुग व उडीद या सर्व पिकांना तातडीने विमा वितरीत करण्याचे आदेश संबंधितांना द्यावेत, विम्यासह शेतकऱ्यांना विशेष मदतीच्या प्रश्नाचे तत्काळ समाधान सरकारने केले नाही तर शेतकऱ्यांच्या रोषाला सरकारला सामोरे जावे लागेल आणि शेतकरी बांधवांबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही त्यांच्या मदतीसाठी आणखी तीव्र आंदोलन करेल.असेही मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष दीपक उंबरकर यांनी सांगितले.

यावेळी मनसे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कैलास दरेकर, मनसे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब मेटे, सचिन वाघूले, जयदीप मिसाळ, महेश मुरकुटे, सुनिल पाचपूते, ज्ञानेश्वर भालेकर, रोहित गावडे, बाबासाहेब झांबरे, युवराज खिळे, अरुण गावडे, अशोक जगताप आदी सर्व मनसेचे पदाधिकारी व शेतकरी बांधव उपस्थित होते.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.

शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा

श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.

श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.

श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका

श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर

वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार

विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे

सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता

श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न

अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात

दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील

महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.

दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.

सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन

अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद