By : Polticalface Team ,Fri Sep 16 2022 17:23:59 GMT+0530 (India Standard Time)
मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे. मुळा नदीला पूर आला आहे. त्यामुळे मुळा धरणात पाण्याची आवक वाढली असून, धरणातून १५ हजार क्सुसेकने विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा पाटबंधारे विभागाने दिला आहे.
तर नाशिकमधील नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यातून ३६ हजार ७३२ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर घोड धरणातून घोड नदीत २५ हजार क्युकेसने विसर्ग सुरू आहे. तर भिमा नदीवरील दौंड पूल येथून ३६ हजार २७५ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
येडगाव धरणातून ९ हजार ३०० क्युसेकने कुकडी नदीत पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर जायकवाडी धरणातून गोदावरीत ५६ हजार ५९२ क्सुसेकने विसर्ग सुरू आहे. त्यामुळे गोदावरी नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे वाचक क्रमांक :