By : Polticalface Team ,Fri Sep 16 2022 18:31:12 GMT+0530 (India Standard Time)
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मलकापुर इथले दोन तरुण पोलीस भरतीची तयारीसाठी दररोज सकाळच्या सुमारास धावण्याचा सराव करत असत. मात्र, आजची पहाट या दोघांसाठी धोकादायक ठरली.
पहाटेच्या सुमारास रस्त्याच्या बाजूने धावत असताना एक एसटी बस जोरदार वेगाने धावत गेली. एसटी बसचा मागील टायर नजीकचा पत्रा बाहेर आला असल्याने या दोन्ही तरुणांचे हात या पत्र्याने कापले गेले. जवळपास 60 फूट दोघांचे हात उडून पडले आहेत.
ही घटना घडल्यानंतर प्रत्यक्षदर्शींनी या दोन्ही तरुणांना तत्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सध्या या दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात आले. दरम्यान, दोघांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
या घटनेनंतर मलकापुरमधील संतप्त नागरिकांनी एसटी आगार व्यवस्थापकाच्या कार्यालयावर हल्ला करुन सदरील घटनेचा निषेध नोंदवला आहे वाचक क्रमांक :