पडवी ग्रामपंचायतच्या माध्यमातून राष्ट्रीय पोषण आहार जागृती अभियान कार्यक्रमाचा प्रारंभ

By : Polticalface Team ,Sun Sep 18 2022 00:28:39 GMT+0530 (India Standard Time)

पडवी ग्रामपंचायतच्या माध्यमातून  राष्ट्रीय पोषण आहार जागृती अभियान कार्यक्रमाचा प्रारंभ दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड, दौंड ता,१७/०९/२०२२,रोजी मौजे पडवी ग्रामपंचायत सभागृह येथे राष्ट्रीय पोषण आहार जागृती अभियान दि, १ सप्टेंबर पासून ते ३० सप्टेंबर पर्यंत दौंड तालुक्यात विविध ठिकाणी राबविण्यात येणार असून, या योजनेचा शुभारंभ पडवी ग्रामपंचायतीच्या वतीने तालुक्यात प्रथम राबविण्यात येत असल्याचे पंचायत समिती बाल कल्याण विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले, एकात्मता बालविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय दौंड, पंचायत समिती, बालविकास प्रकल्प अधिकारी सौ अक्षदा शिंदे मॅडम यांच्या हस्ते प्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून, दीप प्रज्वलन करण्यात आले, या प्रसंगी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मा,आयुष प्रसाद,तसेच मा जामनसिंग सिरासे प्रामुख्याने उपस्थित होते, पडवी ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला, दौंड तालुकास्तरीय राष्ट्रीय पोषण आहार जागृती अभियान अंतर्गत या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीत सौ डॉ,स्वाती लंगारे, पर्यवेक्षक श्रीमती मनीषा राऊत,सौ अर्चना जाधव,सौ शोभा गायकवाड, मान्यवरांच्या उपस्थितीत राष्ट्रीय पोषण आहार जागृती अभियान कार्यक्रम मोठ्या उत्सुकतेने करण्यात आला, जिल्हा परिषद बाल कल्याण विभागाच्या माध्यमातून, दौंड पंचायत समिती तालुकास्तरावर अंगणवाडी विकास कामासाठी १० टक्के निधी देण्यात येतो, दौंड तालुक्यात एक महिन्याच्या कालावधी पर्यंत राष्ट्रीय पोषण आहार योजना कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे शिंदे मॅडम यांनी सांगितले, या कार्यक्रमाची सुरुवात पडवी ग्रामपंचायत पासुन सुरु होत आहे, ग्रामीण भागातील रोजंदारी तसेच अल्पभूधारक कुटुंबातील गर्भवती महिला तसेच लहान मुलं मुली यांचे आरोग्य आहार वेळेत घेतल्यास कुपोषित पणा येणार नाही, गर्भवती महिलांन विषयी गर्भ संस्कार संगोपन लहान विध्यार्थी यांच्या आहार व आरोग्य संदर्भात डॉ स्वाती लंगारे यांनी महत्वाचे मार्गदर्शन केले, जिल्हा परिषद बालकल्याण विभाग व दौड तालुकास्तरीय पंचायत समिती बालकल्याण विभाग मार्फत अंगणवाडी पोषण आहार जागृती अभियान कार्यक्रम राबविण्यात येत आहे,हे अतिशय महत्त्वाचे कार्य असून यासंदर्भात मोलाचे कार्य अंगणवाडी सेविकांनी या राष्ट्रीय पोषण आहार योजने अंतर्गत, कौतुकास्पद कामगिरी केली असल्याचे दौंड तालुका पंचायत समिती बालविकास प्रकल्प अधिकारी सौ अक्षदा शिंदे मॅडम यांनी बोलताना सांगितले, राष्ट्रीय पोषण आहार जनजागृती अभियान अंतर्गत पडवी अंगणवाडीतील लहान विद्यार्थीनींनी गावातून प्रभात फेरी काढून पोषण आहार या संदर्भात महत्त्वाच्या घोषणा देत आहार जागृती करण्यात आली, तसेच अंगणवाडी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून भाजी मंडईत विविध तरकारी, फळांचे प्रदर्शन करुन आठवडे बाजार भरवण्यात आला होता, निसर्गरम्य रांगोळीचे छायाचित्र पाहून या छोट्या विक्रीर्त्यांना पाहुन उपस्थिती मान्यवरांचे लक्ष वेधले होते, राष्ट्रीय पोषण आहार जागृती अभियान राबविण्यात आल्याने पडवी गावात आगळा वेगळा उपक्रम दिसुन आला, या प्रसंगी पडवी ग्रामपंचायत विद्यमान सरपंच नागेश मोरे,माजी सरपंच संजीवनी शितोळे, सदस्य सौ,शितल शितोळे, प्रमोद शितोळे, अनिल शितोळे, ग्रामविकास अधिकारी दळवी मॅडम, गाव कामगार तलाठी, सौ रेखा मंडले, माजी सैनिक गोकुळराव जगताप, तंटामुक्ती अध्यक्ष चंद्र कारभारी शितोळे, माणिक नाना शितोळे, युवक कार्यकर्ते प्रदीप शितोळे, पडवी ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते, कार्यक्रमाची सांगता अंगणवाडी सेविकांनी गीत व पोवाडा व सादरी करण्यात आली, कार्यक्रमाचे नियोजन, अंगणवाडी सेविका सौ, रेखा शितोळे, सौ पुष्पा शितोळे, सौ छाया बारवकर, सौ छाया बारवकर, अंगणवाडी मदतनीस सौ सुवर्णा जाधव, श्रीमती लता गायकवाड, सौ राणी गायकवाड, सौ खंडाळे मॅडम यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले आहे, कार्यक्रमास पडवी गावातील बहुसंख्या महिलांनी प्रतिसाद दिला, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती राऊत मॅडम यांनी केले, आभार सौ अर्चना गायकवाड यांनी मानले
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड नगरपरिषद निवडणूक प्रचार सभा जोरदार. मी कामाचा माणूस आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार.

दौंड नगरपरिषद निवडणूक प्रचार सभा जोरदार. मी कामाचा माणूस आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार.

दौड शुगर साखर कारखान्यात एका उस वाहनाचे दोन वेळा वजन करून आर्थिक फसवणुक प्रकरणी ऋषिकेश गिरीधर चैंडे याचे विरुद्ध गुन्हा दाखल.

ओंकार साखर ग्रूप कर्मचाऱ्यांसाठी २०% पगारवाढ जाहीर.चेअरमन मा.श्री.बाबुराव बोत्रे पाटील.

दौंड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 दौंड शहरातील मतदार जन जागृती पथनाट्याने नागरिकांचे लक्ष वेधले

कुरकुंभ येथील देवांश पान शॉप टपरीच्या आडोशाला देशी दारू टँगो पंच विक्री अट्यावर पोलिसांची कारवाई आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

यवत ग्रामपंचायत कार्यालयात आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे. आदर्श पिता रामजी बाबा आंबेडकर. पंडित जवाहरलाल नेहरू. महापुरुषांची जयंती साजरी.

देवदर्शन यात्रेला गेलेल्या बसचा भीषण अपघात 20 महिला जखमी

श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक महा विकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार

श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक महा विकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार

श्रीगोंदा नगरपालिका निवडणुक महाविकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार

श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सुरू. यवत नगरी हरिनामाने झाली भक्तीमय

नगराध्यक्ष पदासाठी इंद्रायणी पाचपुते चर्चेत ? श्रीगोंदा नगरीत वातावरण वातावरण सस्पेन्स .!

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न