दौंड मधिल विद्युत डीपी बनवणाऱ्या कंपनीतील सुरक्षारक्षकाचे हातपाय बांधून अज्ञात ५ चोरट्यांनी घातला दरोडा

By : Polticalface Team ,Sun Sep 18 2022 19:16:15 GMT+0530 (India Standard Time)

दौंड मधिल विद्युत डीपी बनवणाऱ्या कंपनीतील सुरक्षारक्षकाचे हातपाय बांधून अज्ञात ५ चोरट्यांनी घातला दरोडा दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड, दौंड ता १८/०९/२०२२, दौंड शहरातील वेताळ नगर मधिल महावितरण विद्युत डीपी साहित्य बनवणाऱ्या कंपनीवर अज्ञात चोरट्यांनी दरोडा टाकून, महावितरण विद्युत कंपनी मधील साहित्यावर चोरट्यांनी डल्ला मारला, अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या वेळी कंपनीत असणाऱ्या सुरक्षा रक्षकाचे हातपाय बांधून, कंपनीमधील ७६, हजार ५००, रुपये किमतीचे साहित्य पळून नेले, यासंदर्भात कंपनीचे मालक रोहित बाळासो जगदाळे, रा, वेताळ नगर दौंड, यांनी दौंड शहरातील पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने, दौंड पोलिसांनी सहा अज्ञात इसमांन विरोधात गुन्हा दाखल केला आहे, सदर गुन्ह्याची खबर मिळताच, बारामती विभाग अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, तसेच दौंड पोलीस निरीक्षक विनोद घुगे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शेळके, यांनी तत्काळ घटनास्थळी पोचले, कंपनीच्या मालकाची भेट घेऊन, चोरी झालेल्या संपूर्ण साहित्य संदर्भात फिर्यादीकडुन माहिती घेऊन पोलीस पथकाला सदर चोरी प्रकरणी तपास यंत्रणेकामी सूचना केली आहे, दरोडेखोरांनी कंपनीच्या गोडवान मधील विद्युत डिपीच्या तांब्याच्या तारा व पितळी धातूचे साहित्य तसेच ॲल्युमिनियम धातूची रॉड आणि कंपनीत बांधून ठेवलेल्या सुरक्षा रक्षकाचा मोबाईल असा एकूण ७६ हजार ५०० रुपयाचा माल ऐवज चोरट्यांनी स्वतःच्या तोंडाला रुमाल बांधून चोरून नेला असल्याचे फिर्यादीत नमूद केली आहे, तसेच दरोडेखोर हे २५ ते ३५ वयोगटातील असून यापैकी एक 65 वयातील असावा अशी माहिती कंपनीतील कर्मचाऱ्यांने पोलिसांना दिली आहे, सदर चोरी प्रकरणातील पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चवरे करीत आहेत,
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.

शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा

श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.

श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.

श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका

श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर

वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार

विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे

सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता

श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न

अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात

दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील

महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.

दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.

सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन

अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद