खरी शिवसेना कोणाची? शरद पवारांचं मोठं विधान

By : Polticalface Team ,Mon Sep 19 2022 16:21:35 GMT+0530 (India Standard Time)

खरी शिवसेना कोणाची? शरद पवारांचं मोठं विधान मुंबई : सध्या दसरा मेळाव्यावरुन शिवसेनेमध्ये जोरदार रस्सीखेस सुरु आहे. त्यामुळे शिवाजी पार्कवर दसरा मेळावा उद्धव ठाकरे यांच्या गटाचा होणार की, एकनाथ शिंदे यांच्या गटाचा हा संभ्रम अद्याप कायम आहे. आता दसरा मेळाव्याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पावार यांनी भाष्य केलं. दसरा मेळाव्याला आतापर्यंत कोणीही विरोध केला नाही. खंर तर शिवाजी पार्क म्हणजे बाळासाहेब ठाकरे, असं गणित आहे. त्यामुळे खरी शिवसेना उद्धव ठाकरे यांचीच आहे, असं पवार म्हणाले.

सध्या उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गटांकडून बीकेसी मैदानावर दसरा मेळावा घेण्यास परवानगी मिळण्यासाठी महापालिकेत अर्ज दाखल करण्यात आले आहेत. मात्र एकनाथ शिंदे गटाला महापालिकेने बीकेसीच्या मैदानावर दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी दिली. तरी देखील शिंदे गट शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी प्रयत्न करत आहे. तर उद्धव ठाकरे गटाला अद्याप कोणत्याच मैदानाची परवानगी मिळालेली नाही.

यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, शिंदेंना बीकेसीचं मैदान दिलंय. आता त्यांनी विरोध करू नये, असं मत त्यांनी मांडलं. मुंबईतील शिवाजी पार्कवर शिवसेनेकडून भव्य दसरा मेळावा आयोजित केला जातो. त्यासाठी दरवर्षी राज्यातून हजारो शिवसैनिक मुंबईत दाखल होत असतात. दरम्यान, शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी शिंदे गट आणि उद्धव ठाकरे समर्थकांमध्ये अजूनही रस्सीखेच सुरू आहे.

दोन्ही गटांकडून बीकेसी मैदानावर दसरा मेळावा घेण्यास परवानगी मिळावी, म्हणून महापालिकेत अर्ज दाखल करण्यात आले. यावर महापालिकेनं निर्णय घेत बीकेसी मैदानावर दसरा मेळावा घेण्यासाठी शिंदे गटाला परवानगी दिलीय. मात्र, अद्याप ठाकरे गटाला दसरा मेळाव्याकरता कोणत्याच मैदानाचा अर्ज मंजूर केलेला नाही. त्यामुळे आता दोन्ही गटाचा दसरा मेळावा नेमकं कोठे होतो? हे पाहणं महत्वाचं असणार आहे

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.

शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा

श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.

श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.

श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका

श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर

वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार

विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे

सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता

श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न

अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात

दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील

महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.

दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.

सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन

अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद