By : Polticalface Team ,Mon Sep 19 2022 18:35:12 GMT+0530 (India Standard Time)
हरयाणा : प्रसिध्द डान्सर सपना चौधरी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सपना चौधरी तिच्या विरोधात न्यायालयाने जारी केलेले वॉरंट रद्द करण्यासाठी लखनौ इथं आली होती.
1 मे 2019 रोजी सपना चौधरीवर फसवणुकीच्या आरोपाप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी 20 जानेवारी 2019 रोजी आयोजक जुनैद अहमद, इवाद अली, रत्नाकर उपाध्याय आणि अमित पांडे यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.
13 ऑक्टोबर 2019 रोजी लखनऊच्या स्मृती उपवनमध्ये दुपारी 3 ते 10 या वेळेत सपनाचा कार्यक्रम होता. कार्यक्रमात प्रवेशासाठी तिकीटांची ऑनलाइन आणि ऑफलाईन प्रति व्यक्ती ३०० रुपये दराने विक्री करण्यात आली.
हा कार्यक्रम पाहण्यासाठी हजारो लोकांनी तिकिटे खरेदी केली मात्र, सपना चौधरी रात्री 10 वाजेपर्यंत आली नाही. कार्यक्रम सुरू न होताच लोकांनी गोंधळ घातला. मात्र, आयोजकांनी तिकिट धारकांचे पैसे परत केले नाहीत.
14 ऑक्टोबर 2018 रोजी आशियाना पोलिस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली होती. दरम्यान, सपना चौधरी सोमवारी न्यायालयात हजर झाली. मात्र, सपनाला न्यायालयाने ताब्यात घेतले आहे
वाचक क्रमांक :