स्वर्गीय शिवाजीराव नागवडे बापूंमुळे सहकार क्षेत्राला महाराष्ट्रात आदर्श नेतृत्व लाभले ह भ प डॉ सुहास महाराज फडतरे

By : Polticalface Team ,Tue Sep 20 2022 15:30:29 GMT+0530 (India Standard Time)

स्वर्गीय शिवाजीराव नागवडे बापूंमुळे सहकार क्षेत्राला महाराष्ट्रात आदर्श नेतृत्व लाभले ह भ प डॉ सुहास महाराज फडतरे लिंपणगाव( प्रतिनिधी) श्रीगोंदा तालुक्याचे भाग्यविधाते, शिक्षण, सहकार महर्षी व माजी आमदार आदरणीय शिवाजीराव नागवडे बापू यांनी श्रीगोंदा हा दुष्काळी तालुका सहकाराच्या माध्यमातून सुजलाम सुफलाम केला सहकार सिंचन व शिक्षण क्षेत्रात बापूंनी मोठे योगदान दिले.असे प्रतिपादन ज्येष्ठ कीर्तनकार ह भ प डॉ सुहास महाराज फडतरे यांनी बापूंच्या चतुर्थ पुण्यस्मरण आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले. सहकार महर्षी व नागवडे कारखान्याचे संस्थापक दिवंगत शिवाजीराव नागवडे बापू यांचे चतुर्थ पुण्यस्मरण कार्यक्रमाचे बापूंच्या स्मृती पुतळ्यासमोर कारखाना कार्यस्थळावर आयोजित करण्यात आला. याप्रसंगी उपस्थित जनतेला प्रबोधन करताना डॉ सुहास महाराज फडतरे पुढे म्हणाले की, सहकार महर्षी बापूंनी 19व्या वर्षी गावच्या सरपंच, चेअरमन पदावर काम करत असताना त्यांच्या खऱ्या अर्थाने राजकीय व सामाजिक जीवनास प्रारंभ झाला. श्रीगोंदा या दुष्काळी तालुक्यातील कष्टकरी, शेतकरी शेतमजूर यांच्या उज्वल भवितव्यासाठी बेलवंडी येथील खाजगी कारखाना विकत घेऊन तो ढोकराई च्या माळरानावरती लिंपणगाव शिवारात सहकारी तत्त्वावर उभारला. तो काळ अत्यंत प्रतिकूल होता. या कारखान्याची उभारणी करताना त्याकाळचे सहकाऱ्यांना बरोबर घेऊन सहकार महर्षी बापूंनी मोठा त्याग व योगदान दिले. त्यांच्या कार्याचे स्मरण होणे हे आजच्या पिढीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे त्यांचे कार्य हे स्वच्छ व दैदीप्य्हमान होते म्हणूनच आज ही सहकाराची वास्तू श्रीगोंदा तालुक्यात उभी आहे. हे श्रीगोंदा तालुक्यातील जनतेचे भाग्य म्हणावे लागेल. असे सांगून ह भ प फडतरे महाराज पुढे म्हणाले की, एवढ्यावरच बापू थांबले नाही तर कुकडीचे पाणी या तालुक्याला मिळवण्यासाठी त्याकाळी विशाल कुकडी परिषदेचा लढा उभारून श्रीगोंदा तालुक्याला कुकडीचे पाणी मिळवून दिले. त्यानंतर घोड च्या पाटपाण्यासाठी बापूंनी शासन दरबारी मोठा संघर्ष केला. म्हणूनच आज श्रीगोंदा तालुक्यात जवळपास 80 टक्के क्षेत्र सिंचन क्षेत्र ओलिताखाली आले. प्रसंगी श्रीगोंदा तालुक्याचा विकास साधत असताना कुटुंबाकडे दुर्लक्ष केले, परंतु कष्टकरी शेतकरी, जनतेकडे मात्र बापूंनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवला त्यांच्या कष्टाला दाम मिळाले पाहिजे ही बापूंची प्रामाणिक इच्छा होती. म्हणूनच आज श्रीगोंदा तालुक्यातील शेतकरी, कष्टकरी, कामगार यांच्या कष्टाला दाम मिळू लागले. असे सांगून ह भ प फडतरे महाराज पुढे म्हणाले की, अलीकडे राजकीय व सामाजिक कार्यात काम करताना निष्ठा लोक पावत चालली आहे. बापूंची जीवनधारा सक्षम होती, बापूंनी दुसऱ्याच्या सुखामध्ये सुख पाहिले त्यातच बापूंनी सुख मानले. त्यामुळे माणूस कसा जगला त्यापेक्षा किती जणांना मोठे केले व आधार दिला हे महत्त्वाचे आहे.

डॉ ह भ प फडतरे महाराज आणखी पुढे म्हणाले की, बापूंच्या राजकीय व सामाजिक जीवनाची सुरुवात खऱ्या अर्थाने गावच्या सरपंच पदापासून त्यांच्या कार्याला जळाली आली. सहकार क्षेत्रात काम करताना बापूंनी विरोधक म्हणून कोणालाही पाहिले नाही. या उलट ते सर्वांच्या सुखदुःखात अग्रेसर होते. सहकाराच्या माध्यमातून सहकार महर्षी बापूंनी शिक्षण संस्था उभ्या केल्या, माझ्या कष्टकरी शेतकऱ्यांची मुले उच्चशिक्षित झाली पाहिजे, उच्च पदस्थ झाली पाहिजे, त्यांना राज्य, देश व जगातील तंत्रज्ञानाची पुरेपूर माहिती मिळाली पाहिजे. वैज्ञानिक झाले पाहिजे, हा दृष्टिकोन बापूंचा बरेच काही सांगून जातो. सहकार महर्षी बापू अद्यापही पंधरा वर्षे हवे होते. त्यातून आजही तालुक्यातील शेतकरी, कष्टकरी, कामगार आणि कार्यकर्ते यांना कारखाना कार्यस्थळावर आल्यानंतर बापू अजून आपल्यात आहेत .असे प्रत्येकाच्या अंतकरणांमध्ये जाणवते. बापू हे आदर्श शैलीचे आदर्श मूर्तीमंत उदाहरण आहे. असे सांगून डॉ फडतरे महाराज पुढे म्हणाले की, बापूंनी काँग्रेस पक्षाची आयुष्यभर विचारधारा डोळ्यासमोर ठेवली. पक्षाला ताकद दिली, पक्ष वाढवला, कार्यकर्त्यांना बळ दिले. या दुष्काळी तालुक्यात सहकाराची वास्तु उभी करून प्रत्येक घटकाला न्याय देत प्रत्येकाला दिशा देण्याचे कार्य बापूंनी अखेरच्या श्वासापर्यंत डोळ्यासमोर ठेवले असे हे सहकार महर्षी बापूंचे जयदीप्यमान कार्य उपस्थित जनतेच्या संख्येवरून दिसते.

सहकार महर्षी बापूंनी अनेक माणसं स्वतःच्या कार्यकर्तृत्वावर जवळ केली, त्यामुळे प्रत्येक घटकातील व्यक्तींनी बापूंवर अपार प्रेम केले. नैतिकता, नीतिमत्ता, प्रेम, जिव्हाळा या बाबी बापूंनी आपल्या संपूर्ण आयुष्यात अंगीकारल्या. यापुढे त्यांचे प्रत्येकाने कार्य डोळ्यासमोर ठेवून आपल्या आयुष्याची वाटचाली पुढे चालू ठेवली पाहिजे. ज्या व्यक्तींनी साठ वर्षे समाजासाठी अहोरात्र कष्ट घेतले. अशा सहकार महर्षी बापूंच्या कार्याचे अनुकरण करण्याची आवश्यकता असून, हीच खरी सहकार महर्षी बापूंना आदरांजली ठरेल अशा शब्दात ह भ प डॉ सुहास महाराज फडतरे यांनी बापूंच्या कार्याचे वर्णन केले.

याप्रसंगी माजी मंत्री आमदार बबनराव पाचपुते ,कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब भोस, घनश्याम आण्णा शेलार, माजी उपाध्यक्ष भगवानराव पाचपुते, राज्य बाजार समितीचे सभापती बाळासाहेब नहाटा, आदीं मान्यवरांनी सहकार महर्षी बापूंच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्तुत्वावर प्रकाश ज्योत टाकत आदरांजली वाहिली.

या कार्यक्रमास नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे, माजी उपाध्यक्ष केशवराव मगर, जिल्हा परिषद च्या माजी सभापती सभापती अनुराधाताई नागवडे, दीपक शेठ नागवडे, माजी संचालक गणपतराव जंगले, अरुणराव पाचपुते, कैलासराव पाचपुते, दीपक पाटील भोसलेेे, जिजाबापू शिंदे, विठ्ठलराव काकडे, प्रा धर्मनाथ काकडे, ह भ प प्रकाश महाराज पंधरकर, डॉ प्रणोतीताई जगताप, श्रीगोंद्याच्या नगराध्यक्ष शुभांगीताई पोटे, मनोहर पोटे, रंगनाथ बिबे, सखाराम जगताप, सचिन कदम, माणिकराव पाचपुते, सतीश मखरे, सुरेशराव लोखंडे, वाल्मीक नागवडे, सुभाषराव कळसकर, दिनकर पंधरकर नागवडे कारखान्याचे सर्व आजी-माजी संचालक कार्यकारी संचालक रमाकांत नाईक आदींसह तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते .सूत्रसंचालन व प्रास्ताविक कारखान्याचे संचालक सुभाषराव शिंदे यांनी केले. ऋणनिर्देश व आभार कारखान्याचे चेअरमन राजेंद्र दादा नागवडे यांनी करत उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.

शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा

श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.

श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.

श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका

श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर

वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार

विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे

सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता

श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न

अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात

दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील

महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.

दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.

सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन

अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद