आदिवासी पारधी समाजाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलनची जिल्हाधिकाऱ्यांकडून दखल.
By : Polticalface Team ,Tue Sep 20 2022 20:17:50 GMT+0530 (India Standard Time)
अहमदनगर (प्रतिनिधी)- मौजे बेलवंडी स्टेशन ता.श्रीगोंदा येथील गट नं. 451 मधील 40 आरक्षेत्र ही महाराष्ट्र शासनाचे असून जमीन आदिवासी विकास प्रकल्प राजुर यांच्या नावे तात्काळ करण्यात यावी व तेथे आदिवासी पारधी समाजासाठी सांस्कृतिक भवन बांधून देण्यात यावे व श्रीगोंदा बायपास चौक येथील राहणाऱ्या लोकांचे तात्काळ नुकसान भरपाई द्यावी व अहमदनगर जिल्ह्यातील शासकीय गायरान जमिनीवरील अतिक्रमण नियम कुल करून सातबारा नोंद करण्यात यावी व गायरान गावठाण निवासी करण्यासाठी केलेले अतिक्रमण नोंद करून मालकी हक्क द्यावा तसेच घरकुल व जातीचे दाखले आधार कार्ड कॅम्पद्वारे मिळावे तसेच आदिवासी पारधी समाजाला तातडीने दारिद्र्य रेषेखालील रेशन कार्ड मिळावे या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करताना वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रा.किसन चव्हाण सर, आदिवासी पारधी समाज संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र काळे, फासेपारधी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अजित भोसले, आदिवासी समाज विकास संस्था अध्यक्ष राहुल भोसले, अँड.योगेश गुंजाळ, महिला श्रीगोंदा तालुका अध्यक्ष छाया भोसले, आदिवासी समाज विकास संस्था उपाध्यक्ष सुरेंद्र काळे, लोक अधिकार आंदोलन संघटनेचे जिल्हा समन्वयक संतोष भोसले, सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल पवार, रामसिंग भोसले, सावकार भोसले, जयश्री काळे, लक्ष्मण मोरे, रवींद्र भोसले, सुखाली भोसले, दीपक काळे, सुरेश काळे, गयाबाई पवार, फुलचंद चव्हाण आदीसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आदिवासी पारधी समाजाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन. बेलवंडी येथील महाराष्ट्र शासनाचे 40 आर जमीन आदिवासी विकास प्रकल्प यांच्या नावे करून आदिवासी पारधी समाजाला सांस्कृतिक भवन उभारून देण्याची मागणी.
आदिवासी पारधी समाजासाठी बेलवंडी स्टेशन येथे महाराष्ट्र शासनाचे प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प राजूर ता.अकोले यांनी गट नं. 451 मध्ये 40 आर या महाराष्ट्र शासनाच्या नावे असलेल्या क्षेत्रांमध्ये आदिवासी पारधी समाजासाठी सांस्कृतिक भवन उभारण्यात येणार असल्याबाबत जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्याकडे मागणी केली होती. या मागणीची दखल घेत जिल्हाधिकारी यांनी आदिवासी पारधी समाजासाठी सांस्कृतिक भवन उभारण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद ग्रामपंचायत शाखा यांना लेखी कळविले आहे. याबाबत प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांचे नावे गट नं. 451 मधील 40 आरक्षेत्र नावे करण्याबाबत ग्रामपंचायत बेलवंडी बु यांनी 11 डिसेंबर 2018 रोजी ग्रामसभा ठराव घेण्यात आला. हे भवन मिळण्यासाठी बेलवंडी ग्रामपंचायतचा ठराव झाल्यानंतर सर्व विभागाच्या वन विभाग, महसूल जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर पंचायत व इतर विभागाच्या एनओसी घेतल्या नंतर भूमी अभिलेख श्रीगोंदा यांच्यामार्फत सदर जागेची मोजणी झाली. जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात महसूल विभागात जमा केलेली आहे. कार्यालयातून मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहमदनगर ग्रामपंचायत शाखा यांना त्यांचा अभिप्राय मागितला सुरुवातीला ग्रामपंचायत ने ठराव दिला होता. परंतु गावातील राजकारणामुळे आता ते त्यांच्या अभिप्राय देण्यास टाळाटाळ करत आहेत त्यांनी सांगितले की गट नं. 451 चा अवतीभवती असलेल्या इतर व्यक्तींच्या सह्या संमती घ्यावी त्यानुसार सदर जमिनीवर असलेल्या इतर व्यक्तींनी सह्या संमती दिले व ती आम्ही ग्रामपंचायत जमा देखील केले आहे. तरीदेखील बेलवंडी येथील सरपंच व ग्रामसेवक व गावकरी पुढारी हे या कामास टाळाटाळ करीत आहे. व त्यामुळे सदर कामास सुरुवातच झालेली नसून महाराष्ट्र शासनाच्या नावे असलेल्या 40 आर क्षेत्र प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प राजूर ता.अकोले यांचे नावे करण्याची मागणी आदिवासी पारधी समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.
शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा
श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.
श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.
श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका
श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर
वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार
विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे
सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता
श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न
अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात
दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील
महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.
दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.
सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन
अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद