By : Polticalface Team ,Wed Sep 21 2022 01:00:22 GMT+0530 (India Standard Time)
मराठी माणसांना बेघर करणाऱ्या गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला पत्राचाळ प्रोजेक्टचं काम देण्याबाबत झालेल्या मीटिंगमध्ये शरद पवारांचाही सहभाग असल्याचा आरोप भातखळकरांनी केला आहे. भाजपच्या या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात मात्र प्रचंड खळबळ माजली आहे..
काय आहे पत्राचाळ घोटाळा? : पत्राचाळ घोटाळा सुमारे १ हजार ३४ कोटी रुपयांचा असल्याचं सांगितलं जातंय. २००७ साली पत्राचाळ जमीन घोटाळ्याची सुरूवात झाली. म्हाडाने पत्राचाळीच्या पुर्नविकासाचे कंत्राट गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीकडे दिले होते. पत्राचाळीत ३ हजार फ्लॅट बनवण्याचे कंत्राट कंपनीला मिळाले होते. त्यापैकी ६७२ फ्लॅट हे चाळीच्या रहिवाशांना मिळणार होते. परंतु पत्राचाळीची जमीन गुरू आशिष कंपनीने परस्पर एका खासगी बिल्डरला विकली असा आरोप आहे वाचक क्रमांक :