दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड,
दौंड तालुक्यातील पारगाव आणि परिसरातील गुऱ्हाळमध्ये प्लास्टिक कचरा आणि चप्पल न जाळण्याचा ठराव मंजूर, येथील गुऱ्हाळ चालक ,मालक, ट्रॅक्टर वाहन चालक आणि ऊस वाहतुकदार परीसरातील ग्रामस्थ कार्यकर्ते यांच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे,
पारगाव पंचक्रोशीत आणि परिसरात 50 हुन अधिक गुळ उद्योग करणारे गुऱ्हाळे आहेत, त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होऊन नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होत आहे. या विरुद्ध संभाजी ब्रिगेडने पारगाव ग्रामपंचायतीला निवेदनाद्वारे मागणी केली आहे, परिसरातील गुऱ्हाळांवर प्लास्टिक कचरा चप्पल जाळण्यात येऊ नये असे निवेदन दिले होते,
येथे निर्माण होणारा गुळ हा अनैसर्गिक आहे, या मध्ये चॉकलेट व कुत्रीम साखर टाकली जाते. या ऐवजी नैसर्गिक गुळ बनविण्याचा निर्णयही घेण्यात येईल, असा ठराव करण्याचा निर्णऊ घेन्यात आला, या प्रसंगी गुऱ्हाळ मालक संघटनेच्या वतीने सोमनाथ ताकवणे यांनी बोलताना सांगितले या व्यवसायात अनेक समस्या निर्माण होत असून याचा त्रास प्रत्येक मालकांना सहन करावा लागत आहे, परप्रांतीय गुऱ्हाळ चालकांन ऐवजी स्थानिक नागरिकांनी हा पारंपरिक गुळ उत्पादक उद्योग, प्रदूषण मुक्त विरहित गुऱ्हाळ सुरू करण्याचा आमचा मनोदय असल्याचे गुऱ्हाळ मालकांच्या वतीने सांगण्यात आले.
या परिसरात काही प्रदूषण मुक्त विरहित गुऱ्हाळे सुरू करण्यात आली आहेत, या साठी व्यवसायिकांना वेळ देणे गरजेचे आहे, त्यामुळे सर्वानी सहकार्य करणे आवश्यक आहे, सर्वांच्या सहभागातून हे साध्य होईल, असे या बैठकीत सुभाष बोत्रे, सुरेश ताकवणे, शामराव ताकवणे, नाना जेधे, रामकृष्ण ताकवणे, राजहंस रूनवाल, अमोल बोत्रे, विठलं ताकवणे, पिंटू भाडळे, विजय चव्हाण, निलेश ताकवणे, नामदेव काळे, संभाजी ताकवणे, हरिभाऊ बोत्रे, ज्ञानेश्वर मेगावडे या स्थानिक मान्यवरां सह अनेक कार्यकर्ते आणि शेतकरी उपस्थित होते.
चौकट -गुऱ्हाळ व्यवसाय हा येथील बळकट व आथिर्क कणा -पारगाव आणि परिसरात असणारी गुऱ्हाळ हे येथील आर्थिक कणा आहे, भविष्यात कायद्याच्या चाकोरीत राहून हा व्यवसाय करण्यात येईल, आमचा लढा ग्रामपंचायती विरुद्ध आहे, गेली अनेक वर्षे आम्ही मागणी करूनही अनेक गुऱ्हाळावर कचरा जाळला जातोय, मानवाच्या आरोग्याला हानी पोचत आहे, प्रदूषणाचे बाबत हे योग्य नाही, हे थांबणे गरजेचे होते-
संभाजी ताकवणे, संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती दौंड,
गुऱ्हाळावर बाजार पेठ अवलंबून--- गुऱ्हाळ चालकांच्या समस्ये बाबत आमदार राहुल कुल, जिल्हा बँकेचे संचालक रमेश थोरात, यांचेशी चर्चा केली होती, गुऱ्हाळामुळे या भागात महिना अखेर कोटींची उलाढाल होते, त्यामुळे येथील बाजार पेठ ही गुऱ्हाळावर अवलंबून आहे, या सह अनेक तरुण व मजुरांना येथे रोजगार मिळत आहे, अशी प्रतिक्रिया सयाजी ताकवणे जेष्ठ नेते व पंचायत, समिती, दौंड
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.
शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा
श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.
श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.
श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका
श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर
वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार
विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे
सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता
श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न
अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात
दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील
महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.
दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.
सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन
अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद