सहकार महर्षी नागवडे कारखाना उभारणार सी. बी. जी. गॅस व बिकेट प्रकल्प. पत्रकार परिषदेत अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे यांची माहिती

By : Polticalface Team ,Wed Sep 21 2022 17:31:55 GMT+0530 (India Standard Time)

सहकार महर्षी नागवडे कारखाना उभारणार सी. बी. जी. गॅस व बिकेट प्रकल्प. पत्रकार परिषदेत अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे यांची माहिती लिंपणगाव( प्रतिनिधी)- देशामध्ये व राज्यामध्ये पहिल्यांदा सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखाना हा बूट (बांधा, वापरा व हस्तांतरीत करा) या तत्वावर प्रेसमडपासून सी.बी.जी. गॅस तयार करण्याचा व मळीपासून ब्रिकेट तयार करण्याचा प्रकल्प हाती घेणार असून, असा प्रकल्प हाती घेणारा नागवडे साखर कारखाना हा देशामध्ये पहिला सहकारी साखर कारखाना असल्याची माहिती नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कारखान्याच्या अतिथीगृहात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी सांगितले की, आपले कारखान्यामध्ये प्रतिवर्षी जी प्रेसमड तयार होते. त्यापासून सुमारे एक कोटी रुपयापर्यंत उत्पन्न कारखान्यास मिळते. परंतु हा प्रकल्प उभारणी केल्यानंतर त्यापासून सुमारे ४ कोटी रुपये कारखान्यास मिळणार आहे. म्हणजे अप्रत्यक्षरित्या ३ कोटीचे उत्पन्न वाढणार आहे. या प्रकल्पाची सी.बी.जी. गॅस निर्मीतीची प्रतिदिन क्षमता ५ मे.टन असून, या प्रकल्पामध्ये तयार होणारा गॅस वाहनांना इंधन म्हणून वापरला जाणार आहे. सदरचा सी. बी. जी. गॅस हा कारखान्याने शासनाचे दराप्रमाणे घेवून त्याची आऊटलेटद्वारे विक्री केली तर त्यामाध्यमातून सुमारे १ कोटी रुपयांचे उत्पन्न कारखान्यास मिळणार आहे. अशा प्रकारे कारखान्यास दरवर्षी ४ से ५ कोटी नफा मिळणार आहे.

त्याचप्रमाणे बग्यास पासून 900 ते 800 मे. टन प्रतिदिन क्षमतेचा हायडेसिग्नेटेड स्टॉल्क (ब्रिकेट) मनविणेचा प्रकल्प नव्याने हाती घेत आहोत. सध्या वर्गेसपासून साधारण १३०० ते १४०० प्रतीटन उत्पन्न कारखान्यांस मिळते. परंतु सदरचा प्रकल्प हाती घेतलेनंतर सुरुवातीस हा दर सुमारे २००० से २१०० मिळेल व नंतर या दरामध्ये आणखी ८०० ते १००० रुपयापर्यंत वाढ होईल. त्यामुळे कारखान्यास सुमारे ३ ते ४ कोटी रुपये नफा होणार आहे. भविष्यात बग्यास चे व प्रेसमडे दर वाढले तर त्याप्रमाणांत उत्पन्नामध्ये वाढ होणार आहे.

या दोन्ही प्रकल्पाची संचालक मंडळाने समक्ष पहाणी करुन व गेल्या सहा महिन्यांपासून त्याचा अभ्यास करुन हे दोन्ही प्रकल्प प्रायोगिक तत्वावर हाती घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. हे दोन्ही प्रकल्प उभे करत असताना त्यामध्ये कारखान्याची कोणत्याही प्रकारची गुंतवणूक असणार नाही. त्याकरीता कारखाना फक्त जागा उपलब्ध करुन देणार आहे. सदर कंपनीशी १५ वर्षाचा करार पुर्ण झालेनंतर तो प्रकल्प कारखान्याकडे हस्तांतरीत करणेत येणार आहे. अशा प्रकारचे प्रकल्प हाती घेणारा नागवडे सहकारी साखर कारखाना हा पहिला सहकारी साखर कारखाना असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी आयोजित पत्रकार परिषदेस कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब भोस, कारखान्याचे संचालक सर्वश्री सुभाषराव शिंदे, प्रशांत दरेकर, विठ्ठल जंगले, राकेश पाचपुते, भाऊसाहेब नेटके, अनिल मामा पाचपुते, श्रीनिवास घाडगे, लक्ष्मण रायकर, प्रा सुरेश रसाळ, विश्वनाथ गिरमकर, शरद जगताप, सावता हिरवे, संदीप औटी आदी संचालक यावेळी उपस्थित होते.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.