By : Polticalface Team ,Wed Sep 21 2022 18:35:50 GMT+0530 (India Standard Time)
शरद पवारांना बदनाम करण्याचा भाजपाचा डाव आहे. बेछूट आरोप करायची भाजपला सवयच आहे. भाजपची मागणी आहे तर चौकशी करा चौकशीला आमचा विरोध नाही मात्र उगाच पराचा कावळा करू नका असं आव्हाड म्हणाले.
ग्रामपंचायत निवडणुकीत मविआला चांगल यश मिळालं आहे. मविआ सरकारने घेतलेले अनेक चांगले निर्णय बदलल्याचा भाजप-शिंदे गटाला फटका बसल्याचं पवार या वेळेस म्हणाले. दसरा मेळाव्याच्या वादावर बोलताना पवारांनी भाष्य केलंय दसरा मेळाव्याचा वाद वाढू न देण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची असल्याचं सांगत पवारांनी वादाचा चेंडू शिंदे्च्या गोटात टोलावलाय.
काय आहे भाजपचा आरोप? पत्राचाळ प्रकरणामध्ये शरद पवार यांचीही चौकशी व्हावी, अशी मागणी भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केली होती. त्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही अप्रत्यक्षपणे या मागणीला पाठिंबा दिला आहे. पवार केंद्रीय कृषीमंत्री असताना म्हाडाच्या अधिकाऱ्यांसोबत संजय राऊतांच्या उपस्थितीत पत्राचाळसंदर्भात बैठका झाल्या असा आरोप अतुल भातखळकर यांनी केला आहे वाचक क्रमांक :