केंद्रीय अर्थमंत्री मा,निर्मला सीतारामन यांचे पुण्यात आगमन, प्रथम सत्कार जिल्ह्याच्या वतीने, बारामती मतदार संघाचा दौरा आयोजित

By : Polticalface Team ,Wed Sep 21 2022 20:44:39 GMT+0530 (India Standard Time)

केंद्रीय अर्थमंत्री मा,निर्मला सीतारामन यांचे पुण्यात आगमन, प्रथम सत्कार जिल्ह्याच्या वतीने, बारामती मतदार संघाचा दौरा आयोजित दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड, सह प्रमोद शितोळे, पुणे, ता,२१/०९/२०२२,रोजी केंद्रीय अर्थमंत्री मा निर्मला सितारामन यांचे पुणे लोहगाव विमानतळावर भारतीय जनता पार्टीच्या पुणे जिल्ह्याच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार अँड राहुल कुल, जिल्हा उपाध्यक्ष राहुल शेवाळे, राजेंद्र भिंताडे, यांच्या हस्ते प्रथम सत्कार करण्यात आला, भारतीय जनता पार्टीच्या वतीने मा निर्मला सीतारामन यानी बारामती लोकसभा मतदार संघाची जबाबदारी संपूर्णपणे स्वीकारली असल्याने, येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत बारामती कडे राज्याचे लक्ष केंद्रित झाले असल्याचे बोलले जात आहे, मागील काळात या मतदार संघात कांताताई नलवडे, महादेव जानकर, कांचन कुल, यांनी चांगली लढत दिली होती, त्यामुळे पुढील काळात भाजप विरुद्ध (राष्ट्रवादी) महाविकास आघाडी मध्ये काटे की टक्कर व जोरदार लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहेत, केंद्रीय अर्थमंत्री मा निर्मला सीतारामन यांचा दौरा बारामती लोकसभा मतदारसंघातील तालुका निहाय पुढील तीन दिवस ढवळून पिंजून काढण्याचे ठरवले आहे, या दौऱ्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे तालुका आमदार व पदाधिकारी कार्यकारी समन्वयक समिती स्वयंसेवक संघ, बुथ प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन बारामती लोकसभा मतदार संघ बांधण्याचे कार्य जोमाने सुरू केले आहे, बारामती, भोर, पुरंदर, हवेली, दौंड, इंदापूर, दौऱ्याची सुरुवात दि २२ पासुन केंद्रीय अर्थमंत्री मा निर्मला सीतारामन विविध ठिकाणी स्थानिक मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत मा सागर जोशी, तसेच बारामती लोकसभा मतदार संघाचे प्रभारी, मा आमदार राम शिंदे, भारतीय जनता पार्टीचे मा पुणे जिल्हा अध्यक्ष, मा,गणेश भेगडे, पुणे जिल्हा सरचिटणीस मा,अविनाश मोटे, या सह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून शक्ती प्रदर्शन होणार असल्याचे संकेत मिळत आहेत, तसेच भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते यांची प्रामुख्याने उपस्थिती दर्शवली जाईल असे आश्वासन मान्यवरांनी नोंदवले आहे, आज दि २२ रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा दौरा सकाळी ८:२० ते ८;३० पर्यंत आमदार भीमराव अण्णा तापकीर यांच्या निवासस्थानी भेट घेऊन, शिवछत्रपती मंगल कार्यालय अहिल्यादेवी चौक धनकवडी पुणे सातारा रोड, या ठिकाणी स,८;३० ते ९;३० दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विचार परिवार समन्वयक बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे, तसेच धनकवडी पुणे मुक्ताई गार्डन येथे, दौंड तालुक्याचे आमदार अँड राहुल कुल,यांच्या बरोबर निर्मला सीतारामन यांच्या उपस्थितीत, संघटनात्मक कार्यक्रम जिल्हा पदाधिकारी मंडल अध्यक्षांसह बैठक मुक्ताई गार्डन धायरी येथे आयोजित करण्यात आली आहे, तसेच इंदापूर तालुक्याचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील,यांच्या सह संघटनात्मक कार्यक्रम कोअर समितीची बैठक, अविस्मरा हॉल हायवे वारजे येथे होणार आहे, या दौऱ्यामध्ये सूर्यादत्त कॉलेज बावधन ते शिवनेरी मंगल कार्यालय वरवे बु,भोर पर्यंत भव्य मोटर सायकल रॅलीचे नियोजन किरण दगडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे, मा बाबाराजे जाधवराव यांच्या उपस्थितीत दु,१;१५ ते २:३० पर्यंत भारतीय जनता पार्टीचे मोर्चा पदाधिकाऱ्यांन बरोबर मा निर्मला सीतारामन विविध विषयांवर चर्चा करून त्यांच्या बरोबर भोजनाचा स्वाद सूर्यदत्त कॉलेज पाटील नगर बावधन येथे घेणार आहेत, दौंड तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव नाना काळे, मा निर्मला सीतारामन यांच्या बरोबर शिवनेरी मंगल कार्यालय वरवे बु, सातारा रोड येथे लाभार्थींसह चर्चा विनिमय संवाद साधला जाणार आहे, तसेच अण्णासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सायंकाळी ४;४० ते ५;१५ पर्यंत मा निर्मला सीतारामन यांची मुलाखत स्थानिक पत्रकार परिषद होणार आहे, भिवडी तालुका पुरंदर जिल्हा पुणे,या ठिकाणी मा बाळासाहेब गरुड, भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह मा निर्मला सीतारामन यांच्या उपस्थितीत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, आज रोजीचे दिवसभराचे कार्यक्रम आटपुन, संध्या,६;३० ते ७;३० वाजता सासवड येथे, मारुती वनवे, यांच्या सह, मा आप्पासाहेब पुरंदरे, मा चंद्रशेखर जगताप, मा शमीन काझी, मा गिरीश अप्पा जगताप, निर्मला सीतारामन यांच्या उपस्थितीत सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, उद्या पुढील बारामती लोकसभा मतदारसंघातील दौरा सुरू राहिल त्या संदर्भात प्रतीक्षा करा,
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.