श्रीगोंद्याच्या कांदा उत्पादकांचे तहसीलदारांना निवेदन सादर कांद्याच्या भावा संदर्भात 26 सप्टेंबर पासून आमरण उपोषणाचा इशारा

By : Polticalface Team ,Wed Sep 21 2022 21:04:57 GMT+0530 (India Standard Time)

श्रीगोंद्याच्या कांदा उत्पादकांचे तहसीलदारांना निवेदन सादर 
कांद्याच्या भावा संदर्भात 26 सप्टेंबर पासून आमरण उपोषणाचा इशारा लिंपणगाव( प्रतिनिधी) कांद्याच्या भावा संदर्भात केंद्र व राज्य सरकार निर्णय घेत नाहीत, गेल्या पाच सहा महिन्यापासून कांदा वखारीत सडून जात आहे कांद्याला भाव वाढून मिळत नाही . व्यापारी कांदा सहा ते सात रुपयांनी मागणी करतात. या बाजारभावात कांदा शेतकऱ्यांना विकण्यासाठी परवडत नाही. त्यामुळे किमान 30 रुपये दर प्रति किलोला द्यावा, या मागणीसाठी श्रीगोंदा तालुक्यातील शेतकरी सोमवार दिनांक 26 सप्टेंबर 2022 पासून श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण बसणार आहेत. अशी माहिती कांदा उत्पादक शेतकरी पोपटराव संभाजी माने यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

या प्रश्नाबाबत कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी श्रीगोंद्याचे तहसीलदार व संबंधितांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्याला मिळणारे कांदा बाजार भाव हे उत्पादन खर्च पेक्षा खूपच कमी असून शेतकऱ्याला न परवडणारे आहेत. त्यामुळे कांदा उत्पादक स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकत नाही. सरकारने कांदा बाजार भावात हस्तक्षेप करून किमान 30 रुपये प्रति किलो प्रमाणे कांद्याला भाव वाढवून द्यावा, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली असून, पुढे या निवेदनात आणखी म्हटले आहे की, यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्व शेतकरी व शेती अडचणीत आलेली असून, साठवण केलेला कांदा पन्नास टक्के पेक्षा जास्त खराब झाल्याने सरकारने याबाबत विचार करून न्याय द्यावा. या प्रश्नाबाबत सरकारने येत्या तीन ते चार दिवसांमध्ये योग्य तो निर्णय घेतला नाही, तर श्रीगोंदा तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी आमरण उपोषण करणार आहेत. या उपोषण दरम्यान काही अनर्थ घडल्यास त्यास सरकार जबाबदार राहील याची नोंद घ्यावी असे या निवेदनात म्हटले आहे.

दरम्यान 17 सप्टेंबर रोजी पंतप्रधानांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देत आळेफाटा येथील वडगाव आनंदच्या रानमळा येथील शेतकरी दशरथ केदारी या शेतकऱ्याने कर्जबाजारीपणा व शेतीमालास कमी बाजार मिळत असल्यामुळे कंटाळून आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली. आता यापुढे सरकारच्या ढिसाळ कारभारामुळे आणखी किती शेतकऱ्यांना आपला जीव कामावर लागेल. हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. श्रीगोंदा च्या तहसीलदारांना दिलेल्या निवेदनावर पोपटराव माने, जयसिंग शेंडे, दत्तात्रय गिरमकर, लिंपणगावचे उपसरपंच अरविंद कुरुमकर, उमेश गिरमकर, वाणी दीपक कस्तुर, आदींसह अन्य कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या स्वाक्षरी आहेत. त्या निवेदनाच्या प्रती पंतप्रधान, केंद्रीय कृषिमंत्री, केंद्रीय अर्थमंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री, कृषी मंत्री महाराष्ट्र राज्य, विरोधी पक्षनेते, खासदार, आमदार ,जिल्हाधिकारी, पोलीस निरीक्षक श्रीगोंदा, तहसीलदार आदींना पाठवले आहेत.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.

शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा

श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.

श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.

श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका

श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर

वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार

विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे

सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता

श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न

अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात

दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील

महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.

दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.

सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन

अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद