न वटलेल्या धनादेशाच्या आरोपातून आरोपीची निर्दोष मुक्तता
By : Polticalface Team ,Wed Sep 21 2022 23:23:54 GMT+0530 (India Standard Time)
आष्टी प्रतिनिधी :- श्री दत्त कृपा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित टाकळी अमिया ता. आष्टी जि. बीड या पतसंस्थे मार्फत, पतसंस्थे चे व्यवस्थापक रमेश रावसाहेब तावरे यांनी थकीत कर्ज रक्कम रुपये दोन लाख चौतीस हजार सहाशे सहासष्ट रुपयाचा चेक क्रमांक 134048 हा अशोक दामोदर काळे राहनार फत्तेवडगाव ता.आष्टी जि. बीड यांचे नावे कर्ज वसुली साठी बँकेत भरला होता. सदरचा चेक न वटता परत आल्याने पतसंस्थेने एन. आय. ऍक्टचे चे कलम 138 प्रमाणे संक्षिप्त फौ.ख. नं. 505/2018 खटला दाखल केला होता. खटल्यातील फिर्यादी पक्ष व आरोपी पक्षाचा साक्षी पुरावा मा.न्यायालयाने नोंदवून घेतला व दोनी बाजूच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून दिनांक 15/09/2022 रोजी या खटल्याचा निकाल आष्टी न्यायालयाचे न्यायाधीश मा. एम.के. पाटील साहेब यांनी दिला. व या खटल्यातील आरोपाची निर्दोष मुक्तता केली.आरोपीच्या वतीने ऍड बापूसाहेब भास्करराव गर्जे यांनी अभ्यासपूर्ण व प्रभावीपणे आरोपीची बाजू मांडून आरोपीला न्याय मिळवून दिल्यामुळे त्यांचे सर्व स्थरातून अभिनंदन होत आहे.
वाचक क्रमांक :