यवत गावातील हिंदू मुस्लिम धार्मिक परंपरेला, महामार्गाचा फटका, नागरिकांकडून उड्डाण पुलाची मागणी
By : Polticalface Team ,Thu Sep 22 2022 10:30:45 GMT+0530 (India Standard Time)
दौंड, प्रतिनिधी अनिल गायकवाड,
दौंड, ता,२२/०९/२०२२, दौंड तालुक्यातील मौजे यवत ता दौंड जिल्हा पुणे, यवत मुख्य चौकात उड्डाण पूल होण्यासाठी नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे, अनेक वर्षापासून उड्डाण पुलाची मागणी होत आहे, यवत गावातील हिंदू मुस्लिम समाजातील धार्मिक परंपरेला पुणे सोलापूर महामार्गाचा फटका सहन करावा लागत आहे, महामार्गावर दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण अधिक वाढत चालले आहे, महामार्गाच्या लगत बाजुलाने लोखंडी ब्रॅकेट आहेत, त्यावरून महिला लहान थोर सर्व मंडळी उड्या मारत लोखंडी ब्रॅकेटच्या खालून वरून जाण्याचा प्रयत्न केला जातोय, त्यामुळे अनेक नागरिकांचा या ठिकाणी अपघात होऊन, जीव गमावण्याचा प्रसंग व दुर्घटना घडल्या आहेत, यवत गाव हे पुणे सोलापूर महामार्गाच्या दोन्ही बाजूने असुन, नागरी वस्ती कायम आहे, तसेच यवत गावातील हिंदू मुस्लिम बांधवांचे कुलदैवत श्री काळभैरवनाथ मंदिर आणि हजरत बडेशाहवली बाबा दर्गा, महामार्गाच्या दोन्ही बाजूने मंदिर व दर्गा आहे.
गावातील वर्षानुवर्ष असलेली परंपरा दसऱ्याच्या दिवशी गावकरी ग्रामदैवत श्री काळ भैरवनाथाची पालखी गाव प्रदक्षिणा करण्याची प्रथा आहे, गावातील हजरत बडेशाहवली बाबा दर्गा येथे श्री काळ भैरवनाथाची पालखी परंपरेनुसार विराजमान होते, गावातील सर्व लोक आपटा वृक्षाची पाने (सोने लुटण्याचा कार्यक्रम) हिंदू मुस्लिम बांधव एकत्रित येऊन गळाभेट घेऊन संन्मान केला जातो, या पारंपारिक हिंदू मुस्लिम कार्यक्रमांसाठी जाण्या येण्याचा मार्ग मोकळा करावा अशी यवत ग्रामस्थांची,अनेक वर्षापासून मागणी आहे, लोखंडी ब्रॅकेट वरून
श्री काळभैरवनाथाची पालखी तसेच मुस्लिम बांधवांचे धार्मिक कार्यक्रम संदल शरीफ, मोहरम, पंजतन सवारी डोले, पुणे सोलापूर महामार्ग ओलांडून जाणे येणे करण्यास भाग पाडत आहे.
त्यामुळे यवत येथील मुख्य चौकात उड्डाण पूल व्हावा या संदर्भात यवत ग्रामस्थ नागरिकांनी संबंधित लोकप्रतिनिधी बारामती लोकसभा मतदारसंघाचे खासदार मा सुप्रियाताई सुळे, तसेच दौंड तालुका विद्यमान आमदार अँड राहुल कुल, माजी आमदार रमेश थोरात, यांच्याकडे वेळोवेळी मागणी केली आहे, तसेच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना जेष्ठ पत्रकार एम जी शेलार व इतर सहकारी यांनी समक्ष भेटून उड्डाण पुलाची मागणी पत्र देऊन केली आहे, लोक प्रतिनिधींनी यावर उपाय विचार करावा, अशी ग्रामस्थांची भावना आहे, यवत येथे नागरिकांची जास्त वर्दळ असते त्या ठिकाणी येण्या जाण्याचा मार्ग ठेवणे अपेक्षित होते मात्र राष्ट्रीय प्राधिकरण विभागाने यवत गावाच्या पूर्व दिशेला भुयारी मार्गाची एक बोळकांडी ठेवून नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला आहे, याचा परिणाम गावातील ग्रामस्थ व नागरिकांना जीव गमावण्याचा पिंजरा समोर लावलेला दिसतोय ? त्यामुळे यवत गावातील मुख्य चौकात उड्डाण पूल झाल्यास अनेक वर्षापासून निर्माण झालेल्या समस्यावर कायमचा मार्ग निघेल गावातील वाहतुक कोंडीच्या प्रश्नावर कायमचा प्रश्न उपस्थित होत आहे यवत येथील भुयारी मार्गत डबल वाहन आल्यास वाहन चालक गडबडून जातात, अनेक वेळा समोरुन आलेल्या वाहन चालकांच्यात वाद विवाद निर्माण होऊन इतरांना तंटामुक्ती अध्यक्ष पदाचा मान प्राप्त होतोय पावसाळ्यात या भुयारी मार्गात गुडघाभर पाणीसाठा होऊन मासे मारीचा आनंद शाळेतील विद्यार्थी घेतात, नागरिकांना येण्या जाण्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे, यवत गावातील लोकांना लांबून वळसा घालावा लागत असल्याने लोक जवळचा मार्ग समजुन हायवे लगतच्या दोन्ही बाजूने लोखंडी ब्रॅकेटच्या वरून खालुन उड्या मारताना जीवाची पर्वा न करता रस्ता ओलांडत, मुख्य चौकातच जीवाशी खेळत आहेत, त्यामुळे पर्यायाने या ठिकाणी उड्डाण पुलाची अति आवश्यकता असल्याचे बोलले जात आहे, मुख्य चौकात उड्डाण पूल झाल्यास, यवत गावातील रस्ता कोंडीचा प्रश्न मार्गी लागु शकतो, उड्डाण पुला खाली चार चाकी गाडी तळ, छोटे मोठे उद्योग व्यवसाय सुरू होतील, बाजार पेठेला नवी कलाटणी देणारी व्यवस्था निर्माण होऊ शकते,
पुणे सोलापूर महामार्गावरील प्रचंड वाहतूक असल्यामुळे वाहने जोरात असतात वयस्कर तरुण लहान मुले गर्भवती स्त्रियांना प्रवास दरम्यान मोठ्या प्रमाणावर कसरत करावी लागत आहे, गावकऱ्यांनी याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे, यवत गाव तसे लोकसंख्याच्या तुलनेत मोठे आहे, राजकीय वर्तुळात गावातील मान्यवरांना मोठे मानाचे स्थान आहे, राष्ट्रीय प्राधिकरण विभागाकडे स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामपंचायत विभागाकडून उड्डाण पुलाची वारंवार मागणी केली जात आहे, यवत गावात मुख्य चौकात उड्डाण पुल व्हावा हि नागरिकांची अनेक वर्षापासून प्रलंबित असलेली मागणी आहे, दिवसेंदिवस यवत गावातील लोकसंख्या वाढत आहे, पी, एम पी एल बस सुरु झाली असल्याने गावठाणाचा विस्तार वाढत चालला आहे, त्यामुळे या ठिकाणी उड्डाण पूल होणे काळाची गरज आहे.
भुयारी मार्ग मुख्य चौकापासून लांब असल्याने नागरिक यवत चौकातील जवळचा पर्याय रस्ता सुरक्षित नसताना देखील जाणिवपूर्वक जीव धोक्यात घालत आहेत, यवत गावा पासून अर्धा कि,मी, पूर्व पश्चिम कॅनलच्या पुलापर्यंत वळसा घालावा लागत आहे, पूर्व बाजूला मलभारे वस्ती मानको पोवाडा, वाघदरा, तर पश्चिम बाजूला, दोरगेवाडी, धनगर वाडा, रावबाची वस्ती, तीर्थक्षेत्र भुलेश्वर मंदिर, या भागातील शेतकरी नागरिकांना, उड्डाण पूल झाल्यास अधिक सोयीचे होईल, तसेच महामार्गावरील अपघाताचे प्रमाण देखील कमी होईल अशी प्रतिक्रिया यवत ग्रामस्थ नागरिकांमधून येत आहे,
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.