By : Polticalface Team ,Thu Sep 22 2022 12:34:06 GMT+0530 (India Standard Time)
पुढे बोलताना शिंदे म्हणाले की, आम्ही ऐतिहासिक काम केलं. आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाण्याचं काम करत आहोत. बाळासाहेबांचे आदेश मानणारे आम्ही शिवसैनिक आहोत. शिवसैनिक नाराज असताना देखील ज्यांनी निर्णय घ्यायला हवा होता त्यांनी घेतला नाही. त्यामुळे आम्हाला निर्णय घ्यावा लागला.
आमच्या कामाची दखल तब्बल 33 देशांनी घेतली. आम्ही सत्तेत होतो पण न्याय मिळत नव्हता. अन्यायाची देखील एक परिसीमा असते. बाळासाहेबांनी कधीही सत्तेसाठी विचारधारेशी तडजोड केली नाही. त्यामुळे झालेली चुक आम्ही सुधारली. चूक कोणामुळे झाली हे विसरुन जा. आता चूक सुधारली हे महत्वाचं आहे. आम्ही जनतेच्या भावनेचा आदर करत निर्णय घेतला.
आम्हाला गद्दार म्हणतात, पण आम्ही गद्दार नाहीत. आमच्या उठावामुळे गट प्रमुखांना चांगले दिवस आले. आमच्या उठावामुळे आता सभा होऊ लागल्या आहेत. अन्यथा गट प्रमुखांना वर्षावर प्रवेश मिळत नव्हता. गट प्रमुखांची आज उद्धव ठाकरेंना आठवण झाली. पण आमची शिवसेना ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही. आमच्या कामामध्ये स्वार्थ नाही. आमच्याकडे सर्वांना न्याय मिळतो.
तुम्ही आम्हाला आसमान काय दाखवता? आम्ही तुम्हाला तीन महिन्यापूर्वीच आसमान दाखवलं. एवढंच नाही तर माझ्या जवळ सर्वांच्या कामाचा हिशोब आहे. त्यामुळे योग्य वेळ आल्यावर सर्वांचा हिशोब करु, आम्हाला बाप चोरणारी टोळी म्हाणता पण तुम्हाला बापाची टोळी विकणारं म्हणायचं का? असा सवाल करत शिंदेंनी घणाघाती टीका केली. दरम्यान, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिल्लीत मेळावा घेतला. तर उद्धव ठाकरे यांनी आज गोरेगावच्या मैदानावर सभा घेतली. यावेळी दोघांनीही एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत टीकास्त्र सोडले वाचक क्रमांक :