By : Polticalface Team ,Thu Sep 22 2022 12:51:29 GMT+0530 (India Standard Time)
आष्टी येथे सायंकाळी काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात माजी आ.धोंडे म्हणाले की,आष्टी ते अहमदनगर या रेल्वे सेवेचा शुभारंभ दि.२३ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता आष्टी येथे होत आहे.या सुवर्ण दिनाचे साक्षीदार होण्यासाठी मतदार संघातील जनतेने मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहावे असे आवाहन माजी आमदार भीमराव धोंडे यांनी केले आहे.बीड जिल्ह्यातील सर्वसामान्य जनता अहमदनगर- बीड- परळी या रेल्वेमार्गाच्या प्रतीक्षेत असताना तात्कालीन खा.स्व. केशरकाकू क्षीरसागर यांनी या मागणीकडे सातत्याने लक्ष देऊन पाठपुरावा केलेला आहे तसेच बीड जिल्ह्याच्या विकासासाठी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी अहमदनगर- बीड - परळी या रेल्वे मार्गासाठी आवश्यक असलेला महाराष्ट्र राज्याचा आर्थिक वाटा उचलण्याची तयारी दर्शवली त्यानंतर खऱ्या अर्थाने या रेल्वे मार्गासाठी केंद्र शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून स्व. लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांनी यांनी बीड जिल्हा वासियांचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भरपूर परिश्रम घेतलेले आहे.बीड जिल्ह्यातील सर्वसामान्य जनता अहमदनगर - बीड -परळी या रेल्वे मार्गाच्या प्रतीक्षेत असताना लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांनी यांनी बीड जिल्हावासियांचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भरपूर परिश्रम घेतलेले आहेत.तात्कालीन पालकमंत्री भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय सचिव पंकजाताई मुंडे आणि खा.डॉ.प्रीतमताई मुंडे यांनी या रेल्वे सेवेसाठी अथक परिश्रम केल्यामुळेच अखेर बीड जिल्ह्याला रेल्वे सुरू झालेली आहे. या रेल्वे सेवेसाठी बीड जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिक आणि रेल्वे कृती समितीचे नामदेवराव क्षीरसागर आणि इतर अनेक मान्यवरांनी देखील यासाठी शासन दरबारी उंबरठा झिजवलेले आहेत.अखेर या सर्व नेत्यांच्या प्रयत्नाला आज यश येऊन अखेर रेल्वे सेवा सुरू होत आहे ही जिल्ह्याच्या अभिमानाची गोष्ट आहे. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी जनतेने मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहावे असे आवाहन देखील शेवटी भाजप नेते माजी आ.भीमराव धोंडे यांनी केले आहे. वाचक क्रमांक :