पाटोदा नगरपंचायत नगरविकास आराखडा दुरूस्तीसाठी लक्ष्यवेधी धरणे आंदोलन ; पाटोदा -चुंबळी पाणंद रस्ता अतिक्रमण प्रकरण :-डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
By : Polticalface Team ,Thu Sep 22 2022 13:04:33 GMT+0530 (India Standard Time)
पाटोदा: नगर पंचायत कार्यालयामार्फत राबविण्यात आलेला नगरविकास आराखडा (डी.पी.प्लान. )मधील पाटोदा-चुंबळी रस्ता न दर्शविता जाणीवपुर्वक चुकीचा प्लान तयार करणा-या संबधितांवर गुन्हे दाखल करून त्या मार्गावरील अतिक्रमण काढण्यात येऊन रस्ता खुला करण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आज दि.२२ सप्टेंबर २०२२ वार गुरूवार रोजी नगरपंचायत पाटोदा कार्यालयासमोर लक्ष्यवेधी धरणे आंदोलन करण्यात येऊन निवेदन मुख्याधिकारी नगरपंचायत पाटोदा ढाकणे यांना देण्यात आले. आंदोलनात पाटोदा भ्रष्टाचार निर्मूलन समिती तालुकाध्यक्ष हमीदखान पठाण,तोसिफ हमीद,ताहेर हसन बिस्किट्स,अनिकेत राख,दादासाहेब राख,अमोल नाईकनवरे,बाळासाहेब सानप,उद्धव राख,विशाल शेवाळे,आनंद जादव,सोमनाथ मुळे,मनोज पांडव,सागर वाघ,शेख जुनेद,आदि सहभागी झाले होते.
पाटोदा नगरपंचायत कार्यालयामार्फत दि.२३ मे २०२२ रोजी सादर नगरविकास आराखडय़ात (डी.पी. प्लान)जुना पाटोदा ते चुंबळी हा रस्ता ३३ फुट रूंद असुन तो पाटोदा येथुन सुरू होऊन चुंबळी गावापर्यंत जातो परंतु तो जुना रस्ता नगरपंचायत कार्यालयामार्फत नगरविकास आराखडय़ात दाखवण्यात आला नसुन डी.पी.प्लान जाणीवपुर्वक चुकीचा बनवण्यात आला असून त्यामध्ये सर्वे नंबर ७४०, ७४१ , ७४२ च्या पुर्वेला असणारा पाटोदा -चुंबळी रस्ता दाखवण्यात आला नाही.पाटोदा
नगरपंचायत कार्यालयामार्फत राबविण्यात आलेल्या नगरविकास आराखडय़ात त्या जुन्या पाटोदा-चुंबळी पाणंद रस्त्याचा उल्लेख न करता फक्त राज्य महामार्ग ५४८ -डी या रस्त्याचा उल्लेख आहे. वास्तविक सदर राज्य महामार्ग ५४८ -डी व जुना पाटोदा-चुंबळी पाणंद रस्ता यांचा एकमेकाशी काहीही संबंध नसुन सदरील दोन रस्ते वेगवेगळे आहेत. त्यामुळेच याठिकाणी
शहराच्या विकास कामात अडथळा ठरणार असुन याठिकाणी मोठ्याप्रमाणात अतिक्रमण करण्यात आले असून मुळ जागा मालकांवर अन्याय करण्यात आलेला आहे. त्यामुळेच तात्काळ अतिक्रमण काढण्यात येऊन चुकीचा नगरविकास आराखडा बनविणा-या जबाबदार आधिका-यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी जिल्हाधिकारी बीड यांच्यामार्फत मुख्यमंत्री,प्रधान सचिव,नगरविकास मंत्री,विभागीय आयुक्त यांना करण्यात आली आहे.
२ ऑक्टोबर गांधी जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सत्याग्रह आंदोलन :-डाॅ.गणेश ढवळे
___
नगरपंचायत कार्यालयामार्फत नगरविकास आराखडय़ात जाणीवपुर्वक चुका करणा-या संबधितांवर ठोस कारवाई न झाल्यास दि.०२ रोजी ऑक्टोबर गांधी जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयासमोर "सत्याग्रह आंदोलन "करण्यात येणार आहे.
डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
मो.नं.८१८०९२७५७२
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.
शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा
श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.
श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.
श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका
श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर
वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार
विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे
सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता
श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न
अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात
दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील
महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.
दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.
सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन
अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद