आमदार अँड, राहुल कुल यांच्या पाठपुराव्याने दौंड पूर्व भागातील रस्ते नूतन डांबरीकरणाला सुरुवात, अष्टविनायक मार्गाला जोडण्याचा प्रयत्न

By : Polticalface Team ,Thu Sep 22 2022 20:52:25 GMT+0530 (India Standard Time)

आमदार अँड, राहुल कुल यांच्या पाठपुराव्याने दौंड पूर्व भागातील रस्ते नूतन डांबरीकरणाला सुरुवात, अष्टविनायक मार्गाला जोडण्याचा प्रयत्न दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड, दौंड, तालुक्यातील पूर्व भागात अनेक खेडेगावांना जोडणारा रस्ता अखेर नुतन डांबरीकरण करण्याचे काम जोमाने सुरू करण्यात आले आहे, या भागातील नागरिकांना वाहतूकीस बैलगाडीत बसून प्रवास करत असल्याचे अनेक वर्षापासून भासत होते मात्र दौंड तालुक्याचे आमदार अँड राहुल दादा कुल यांच्या पाठपुराव्याने पूर्व भागातील अनेक गावांना जोडणारा रस्ता नुतनीकरण व डांबरीकरणाचे काम सुरू करण्यात आली आहे, काळेवाडी, लोणारवाडी, हिंगणीबेर्डी, या गावांना जोडणारा महत्त्वाचा रस्त्याचे व डांबरीकरणाचे काम सुरू झाल्यामुळे या परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे, दौंड तालुक्यातील पूर्व भागात रस्त्यांची दुरवस्था झाली होती या संदर्भात या भागातील नागरिकांनी वेळो वेळी रस्ता दुरुस्ती करण्याची मागणी केली होती, या अनुषंगाने आमदार अँड राहुल कुल यांनी या भागातील रस्त्याच्या प्रश्नांबाबत लक्ष देऊन त्यांच्या मागणीनुसार सदर पाठपुराव्याने विशेष दुरुस्ती योजने अंतर्गत निधी उपलब्ध करून काही दिवसापासून ह्या भागातील रस्ता नूतन डांबरीकरणाच्या कामाला सुरुवात झाली आहे, अखेर या कामाला मुहूर्त लागला आहे.
आमदार राहुल कुल यांच्या प्रयत्नामुळे रस्ता दुरुस्तीची कामे होत असल्याने या भागातील सर्वसामान्य नागरिक शेतकरी यांना दिलासा मिळाला आहे, दौंड च्या पूर्वपट्यात देऊळगाव राजे, मलठण, हिंगणीबेर्डी, काळेवाडी, लोणारवाडी, या खेडेगावांना जोडणारा महत्त्वाचा रस्ता असुन पूर्व भागातील नागरिकांना अनेक वर्षापासून या रस्त्यावरील खड्ड्यातून प्रवास करावा लागत होता, चिखलातुन मोटर सायकल जाने येणे करण्यास मोठी कसरत करावी लागत होती,मोटर सायकलच्या चाकामध्ये गुतलेला चिखल काढताना रस्त्यावर नागरिक आढळून येत होते,
या भागातील ग्रामस्थांची रस्त्या संदर्भात बोळवण केली जात होती, मात्र आमदार राहुल कुल यांच्या पाठपुराव्याने अनेक वर्षापासून रखडलेल्या व खितपत पडलेल्या रस्त्याचे काम अखेर नुतन डांबरीकरण होत आहे, याचा पूर्व भागातील ग्रामस्थांना सुखाचा प्रवास होईल, अशी,अपेक्षा अनेक नागरिकांनी व्यक्त केली आहे, तसेच लोणारवाडी, काळेवाडी, हिंगणीबेर्डी, शिक्रापूर या प्रत्येक गावातील अंतर्गत सिमेंट रस्त्याचे नियोजन असल्याचे (भाजप) भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून बोलले जात आहे, पुणे सोलापूर महामार्गावरील खडकी पासून ते लोणारवाडी काळेवाडी चौफुला ते हिंगणीबेर्डी ज्योतिबा नगर मार्गे सिद्धटेक रस्त्याच्या साईट पटयाचे काम सुरू आहे.
हा रस्ता सिद्धिविनायक गणरायाचे दर्शन घेण्यासाठी अष्टविनायक महामार्गाला जोडणारा अगदी जवळचा रस्ता आहे, मात्र या रस्त्याची दुरावस्था झाल्याने वाहतूकीचे प्रमाण कमी आहे,परंतु पुणे सोलापूर महामार्गावरील खडकी वरुन लोणारवाडी काळेवाडी चौफुला मार्गे सिद्धटेक,अष्टविनायक मार्गाला जोडणारा जवळचा मार्ग, गणेश भक्तांसाठी प्रवास व वाहतुकीस सोईस्कर व सोप्पा रस्ता होणार आहे, तसेच रावणगाव वरुन बोरीबेल देऊळगाव राजे,दुहेरी मार्गाने सिद्धटेक गणपती दर्शनासाठी भाविकांना जवळपास १२ किलो मीटरचे अंतर कमी होणार असल्याचे मत काळेवाडीचे सामाजिक कार्यकर्ते गणेश गायकवाड यांनी व्यक्त केले आहे,

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.

शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा

श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.

श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.

श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका

श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर

वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार

विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे

सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता

श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न

अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात

दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील

महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.

दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.

सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन

अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद