By : Polticalface Team ,Fri Sep 23 2022 12:58:25 GMT+0530 (India Standard Time)
श्रीगोंदा तालुक्यातील शेडगाव येथील देवानंद बबल्या काळे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हणतात कि गावातील नितीन श्रावण रणसिंग यास सात वर्षांपूर्वी सुमारे २३ हजार रुपये हातउसने दिले होते दि २२ सप्टेंबर रोजी घरकुलाच्या संदर्भात माहिती घेण्यासाठी सकाळी ११ च्या सुमारास ग्रामपंचायत शेडगाव या ठिकाणी गेले असता ग्रामपंचायत समोर थांबलेले असताना नितीन श्रावण रणसिंग व दादा रणसिंग याना फिर्यादी काळे यांनी सात वर्षांपूर्वी दिलेले हातउसने पैशे मागितल्याचा राग आल्याने रणसिंग यांनी काळे यास शिवीगाळ करून तुझे पैशे देणार नाही व तुला गावातही राहून देणार नाही असे म्हणत नितीन रणसिंग याने हातातील दाव्याने पाठीवर मारले डाव्या हाताने करंगळीजबल मराऊन जखमी केले त्यावेळी गावातील सरपंच विजय शेंडे विजय रसाळ राजू खुडे ऋषिकेश धेंडे व इतर गावकरी जमा झाले आणि सर्वानी मिळून भांडण सोडविले त्यानंतर देवानंद बबल्या काळे यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात येऊन नितीन श्रावण रणसिंग ,दादा रणसिंग दोघे राहणार शेडगाव यांच्यावर श्रीगोंदा पोलीस ठाण्यात भादंवि ३२४,३२३,५०४,५०६,३४ नुसार गुन्हा दाखल केला असून सदर घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सम्भाजी शिंदे हे करत आहेत. गावात वेगळीच चर्चा: तालुक्यातील शेडगाव या ठिकाणी देवानंद बबल्या काळे यांनी नितीन श्रावण रणसिंग यास सात वर्षांपूर्वी सुमारे २३ हजार उसने दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे मात्र हे पैशे उसने नसून सावकारकी अंतर्गत व्याजाने दिले असल्याची परिसरात जोरदार चर्चा ऐकण्यास मिळत आहे वाचक क्रमांक :