यवत येथील बैल बाजारातच भरला, बैल पोळ्याचा बाजार, लंपी स्किन आजाराचा प्रादुर्भाव, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे आदेश
By : Polticalface Team ,Fri Sep 23 2022 18:41:23 GMT+0530 (India Standard Time)
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड,
दौंड ता २३/०९/२०२२, दौंड तालुक्यातील व यवत पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने आव्हान करण्यात आले आहे प्राण्यांमधील संसर्गजन्य लंपी स्किन डिसीज आजाराने परिसरातील जनावरांना बाधा होऊ नये या अनुषंगाने जिल्हा कार्यालय पुणे आपत्ती व्यवस्थापन उपविभागीय अधिकारी आणि दौंड तालुका तहसीलदार गटविकास अधिकारी पशुसंवर्धन विभागाच्या मार्फत सर्व शेतकऱ्यांना नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, प्राण्यांमधील संसर्गजन्य लंपी स्किन डिसीज रोग प्रतिबंध नियंत्रण अधिनियमाच्या अनुषंगाने या कठीण परिस्थितीत बैलपोळा येत असल्याने सर्व शेतकऱ्यांनी लंपी स्किन आजारापासून आपल्या जनावरांचे संरक्षण करण्यासाठी शासनाच्या अधीन राहून नियमांचे पालन करण्यात यावे, आपल्या जवळ असलेल्या जनावरांसाठी या वेळी बैलपोळा घरीच साजरा करावा त्यामुळे इतरांना व आपल्या जनावरांना या आजाराची बाधा होणार नाही याची दक्षता सर्वसामान्य शेतकऱ्यांनी घ्यावी.
आज दि,२३ रोजी यवत येथील आठवडा बाजारात नेहमीच्या ठिकाणी बैल बाजारात बैलांन ऐवजी बैलपोळ्याचा बाजार भरला होता, या बाजार पेठेत विविध प्रकारचे बैल सजवण्याचे साहित्य विक्रेते व्यापाऱ्यांनी उपलब्ध केले होते, मात्र बाजारात हवी तशी वर्दळ व साहित्य खरेदीदार जोमाने खरेदी करण्यास धजवत नव्हते, या वेळी यवत बैल बाजारात बैल पोळ्याच्या निमित्ताने साहित्य विक्रेते समाधान टेंडर्स दुकानाचे मालकास संपर्क साधला असता ते म्हणाले या वेळी बैल पोळ्याचा बाजार प्रत्येक ठिकाणी मंदावला आहे.
भिगवण, श्रीगोंदा, राशिन, बारामती सुपा, आणि आज यवत येथे,उद्या काष्टी बाजारात जायचे आहे,या भागात देशी गाय बैल कमी प्रमाणात आहेत, खिंलारी बैल जोडी हौशी लोक बोटावर मोजता येतील इतकेच राहिले आहेत, अशी प्रतिक्रिया रविंद्र सुटे व समाधान सुटे रा लोणार जिल्हा बुलढाणा, यानी व्यक्त केली आहे, तसेच यवत गावातील शेतकरी हनुमंतराव तांबे,गोटुराम खैरे
यांनी लंपी स्किन आजाराचा प्रादुर्भाव आपल्या भागात कमी प्रमाण असून, शेतकऱ्यांनी व व्यापारी बांधवांनी जनावरांच्या बाबत वेळेत दक्षता घ्यावी पुढील काळात यवत गावातील मान्यवर ग्रामस्थ ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच पदाधिकारी पुर्वी प्रमाणे बैल बाजार भरवण्याचा नक्की सकारात्मक प्रयत्न करतील अशी अपेक्षा व्यक्त केली.
पुढील दोन दिवसांत दि,२५ रोजी बैलपोळा सणाचा उत्सव येत असल्याने यवत आठवडे बाजारात बैलपोळा साहित्य विक्रेते मोठ्या प्रमाणात आले होते, त्यांच्याकडे विक्रीसाठी बैलांना रंग रंगुटी पितळी घंट्याच्या माळा रंगी बेरंगी मण्यांच्या माळा, बैलांना नवीन रंगी बेरंगी मखमली गोंडा झुली, तसेच बैल जोडीला बाशिंग मुरखी व रंगीबेरंगी कासरे आणि हातभर डांडीचा गोंडस आसुड खांद्यावर टाकुन मोठ्या डौलात झोकात खिंल्लारी बैल जोड साठी मोठ्या उत्साहाने बैल जोडीला शोभेल असे विविध प्रकारचे साहित्य घेऊन शेतकरी मोठ्या उत्साहाने घरी गेला.
मात्र या दोन वर्षात कोरोणा काळात मानवाच्या जीवित्वास धोका निर्माण करणारे (विषाणू) संसर्गजन्य रोगाने थैमान घातले होते, या कोरोणा आजारांमध्ये जगातील मानवाला बेजार व हैराण केले होते, हिच परस्थिती आता पाळीव प्राणी जनावरांवर वेळ आली आहे, लंपी स्किन रोगाचा प्रादुर्भाव प्राण्यांमधील संक्रमण व संसर्गजन्य रोग प्रतिबंध व नियंत्रण अधिनियमाच्या अनुषंगाने लंपी स्किन डिसीज हा रोग येऊन ठेपला असल्याने जिल्हा कार्यालय पुणे आपत्ती व्यवस्थापन उपविभागीय अधिकारी तसेच दौंड तहसीलदार कार्यालय गट विकास अधिकारी पशुसंवर्धन विभागा मार्फत या वर्षी बैलपोळा साजरा करण्यास शेतकऱ्यांना मनाई घालण्यात आली आहे, तसेच जनावरांचा बैल बाजार भरवणे, प्रदर्शन भरवणे, बैल यात्रा भरवणे.
बैल गाई, मैस, घोड, गाढव, प्राण्यांमध्ये लंपी स्किन डिसीज आजाराचा प्रादुर्भाव आढळून येत असल्याने, हा आजार संसर्गजन्य रोगांपासून संरक्षण करण्यासाठी लंपी आजाराने त्रस्त असलेले प्राणी यांना कोरंटाईन करण्यात यावी, वैरण चारा कडवळ मका घास, हत्ती गवत, आजारी जनावरांना चे वेगळे ठेवण्यात यावेत महत्वाचे या लंपी आजारात वेळेत उपचार केल्यास जनावरे ठणठणीत बरे होत असल्याचे निदर्शनास आले आहे, तसेच पाळीव जनावरांना वाहनांमध्ये किंवा ओढत इतर ठिकाणी घेऊन जाण्यास प्रवास करण्यास सक्त मनाई करण्यात आली असून सर्व शेतकऱ्यांना व व्यापारी क्षेत्रातील नागरिकांना बंधन घालण्यात आले आहे,
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.
शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा
श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.
श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.
श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका
श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर
वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार
विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे
सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता
श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न
अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात
दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील
महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.
दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.
सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन
अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद