कर्मवीर भाऊराव पाटील यांचे त्याग व संघर्षातून रयत शिक्षण संस्थेचे माध्यमातून खेडोपाडी शिक्षणाची संधी देण्याचे बहुमोल कार्यः सुप्रसिध्द इतिहास अभ्यासक सोमनाथ गोडसे.
By : Polticalface Team ,Fri Sep 23 2022 23:47:01 GMT+0530 (India Standard Time)
लिंपणगाव (प्रतिनिधी.) शिक्षण ही शाश्वत संपत्ती आहे.शिक्षणातूनच समाज परिवर्तन होवू शकते.कमवा व शिका योजनेतून रयतमध्ये स्वावलंबनाचे धडे मिळतात.रयत शिक्षण संस्था ही देशातील नामांकित संस्था म्हणून नावलौकीक मिळविला आहे.यशस्वी जीवनासाठी खडतर परिश्रमाला पर्याय नाही.कर्मवीर भाऊराव पाटील त्याग व संघर्षातून रयत शिक्षण संस्थेचे माध्यमातून खेडोपाडी शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याचे बहुमोल कार्य केले आहे.असे प्रतिपादन सुप्रसिध्द वक्ते इतिहास अभ्यासक सोमनाथ गोडसे यांनी काष्टी येथे कर्मवीर पाटील जयंती कार्यक्रमात बोलताना केले.माजीमंत्री बबनराव पाचपुते अध्यक्षस्थानी होते.जनता विद्यालय व जनता कन्या विद्यालयाचे संयुक्त विद्यमाने काष्टीत कर्मवीर जयंती सोहळा आमदार बबनराव पाचपुते यांचे अध्यक्षतेखाली झाला.प्रमुख वक्ते सोमनाथ गोडसे होते. प्रमुख पाहुणे डाॅ.प्रतिभा पाचपुते, कुंडलीक दरेकर, अरूणराव पाचपुते, भगवानराव पाचपुते, बाळाप्पा राहिंज, दिपक भोसले, शिवाजीराव बाबासाहेब पाचपुते, राकेश पाचपुते, राजेंद्र पाचपुते, सौ.सुवर्णा पाचपुते, आशा खोसे,बंडूतात्या जगताप, शहाजी भोसले, दीपक थोरात, रमेश दांगट, राहुल पाचपुते, शरद भोसले, सुनिल पाचपुते, महेश पाचपुते, डाॅ.बाळासाहेब पवार, राजेंद्र गुळवे, सतिष जगताप, विवेकानंद फडणीस, रफीक इनामदार, मदन गडदे, गुलाबभाई तांबोळी, थोरात सर, पोंदकुले साहेब आदिंसह विविध संस्था व ग्रामपंचातीचे पदाधिकारी उपस्थित होते. पाहुण्यांचे हस्ते अटल टिंकरिंग लॅबचे उदघाटन करण्यात आले.यशस्वी विद्यार्थांना पारितोषिक वितरण करण्यात आले. प्राचार्य पंडीत घोंगडे यांनी प्रास्ताविक भाषण केले. मुख्याध्यापिका सौ.मंगल जोगदंड यांनी अहवाल वाचन केले.एच.पी.शिंदे यांनी खुमासदार शैलीत सुत्रसंचालन केले.अध्यक्षीय भाषणात आमदार बबनराव पाचपुते म्हणाले की शिक्षणातून सुसंस्कृत नागरीक तयार झाले पाहिजेत.ज्ञान,शिक्षणाबरोबरच सामाजिक शहाणपण जीवनात यशप्राप्तीसाठी महत्वाचे आहे.विद्यार्थ्यांनी अभ्यासाइतकेच व्यायामाकडे लक्ष दिले पाहिजे. असे मत आमदार पाचपुते यांनी व्यक्त केले.आमदार बबनराव पाचपुते व उपस्थित मान्यवरांचे हस्ते कर्मवीर भाऊराव पाटील यांचे प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.संजय मांडे व सुनिल शिंदे यांनी आभार मानले.समाप्त फोटोओळी काष्टी येथील जनता विद्यालयात कर्मवीर पाटील जयंती सोहळ्यात बोलताना इतिहास अभ्यासक सोमनाथ गोडसे. व्यासपीठावर आमदार बबनराव पाचपुते, कुंडलीक दरेकर, भगवानराव पाचपुते,अरूणराव पाचपुते व अन्य मान्यवर.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.
शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा
श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.
श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.
श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका
श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर
वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार
विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे
सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता
श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न
अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात
दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील
महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.
दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.
सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन
अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद