शरदचंद्रजी पवार साहेब, तुम्ही संरक्षण व कृषी मंत्री असताना महाराष्ट्रासाठी काय केले, ? निर्मला सीतारामन
By : Polticalface Team ,Sat Sep 24 2022 20:22:57 GMT+0530 (India Standard Time)
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड,
दौंड,ता,२४/०९/२०२२, भारती जनता पार्टीचे केंद्रीय अर्थमंत्री मा, निर्मला सीतारामन यांचा बारामती लोकसभा मतदारसंघातील दौरा गेली दोन दिवस पूर्ण करुन आज दौंड विधानसभा शहर व तालुक्यातील मतदारांची थेट संवाद साधत डॉक्टर्स वकील व्यापारी चार्ट अकाउंटर्स तसेच व्यापारी बंधू उद्योजकांशी चर्चा करून विविध समस्या समजावून घेतल्या.
राहु पिंपळगाव येथे दौरा कार्यक्रम संपन्न होत असताना दौंड तालुक्याचे आमदार अँड राहुल कुल यांच्या निवासस्थानी केंद्रीय मंत्री यांनी भेट दिली, या प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे महिला आघाडी पुणे जिल्हा अध्यक्षा कांचन ताई कुल यांच्या मार्गदर्शनाखाली महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता या वेळी केंद्रीय मंत्री महाविकास आघाडी व राष्ट्रवादी संदर्भात बोलताना म्हणाल्या तुम्ही देशाचे संरक्षण व कृषी मंत्री असताना, महाराष्ट्रासाठी काय केले? असा सवाल केंद्रिय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी राहू येथे झालेल्या महिला मेळाव्यात मा शरदचंद्र पवार यांचे नाव न घेता सवाल उपस्थित केला आहे, फक्त घराणे शाही व राष्ट्रवादी पार्टी साठी काम केले. आपल्या मर्जीतील लोकांना पदे देऊन, पूर्ण पक्षावर फक्त आपलेच नियंत्रण कसे राहील, एवढेच फक्त पाहिले, अशी घनाघाती टीका करत पुढे बोलताना.स्वर्गीय मनोहर पर्रीकर संरक्षण मंत्री असताना डिफेन्स एक्स्पो गोव्याला भरवून अनके संधी निर्माण केल्या, त्याच धर्तीवर तामिळनाडू मध्ये संरक्षण प्रदर्शन भरवून त्या माध्यमातून डिफेन्स कॉरिडॉर ची निर्मिती केली.
या विषयाची आठवण करून देत बारामती करांना सुनावले, मा शरदचंद्र पवार (तुम्ही) संरक्षण मंत्री असताना महाराष्ट्राससाठी काय केले हे मी तुम्हाला बारामतीच्या भूमीत येऊन विचारत आहे. माताजी-पिताजी भाई या भतीजा यांच्या पुढे तुम्ही व तुमची पार्टी कधी गेलीच नाही, अशा शब्दात केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन सडकुन टीका केली. तसेच पुढे बोलताना म्हणाले मागील सरकारने केंद्राच्या योजना या केंद्राला श्रेय मिळु नये म्हणून अनेक योजनांना खोडा घातला, परंतु आता ती कामे जोरदार पणे मार्गी लागणार आहेत. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेच्या माध्यमातून ८० कोटी गरिब जनतेला, अन्नधान्य सुरक्षा योजनेच्या माध्यमातून पुरविण्याचे काम मोदी सरकारने केले आहे. महिलांना केंद्र बिंदू मानून अनेक योजनावर सरकार काम करत आहे, व अनेक योजना चालूं आहेत, त्याचाच भाग म्हणून बेटी बचाव -बेटी पढाव या सारख्या योजना चालू आहेत. व राहतील, बारामती लोकसभा मतदारसंघातील तालुका निहाय भेटी देऊन या मतदार संघाच्या विविध अडी अडचणीतील पुढील काळात सोईच्या दृष्टीने विचार करत आढावा घेण्यात आला असून बारामती लोकसभा मतदारसंघाला येणाऱ्या निवडणुकीत भक्कम उमेदवार देण्याचे संकेत मतदारांनी ओळखून घेतले असल्याचे बोलले जात आहे, तसेच या प्रसंगी लोकसभा प्रभारी आमदार राम शिंदे किसन मोर्चा प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे माजी मंत्री हर्षवर्धनजी पाटील आमदार राहुल कुल, सुनीलजी कर्जतकर बाळाभाऊ भेगडे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यासह भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.