चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग नजरकैदेत? सुब्रमण्यम स्वामी यांच्या ट्विटने खळबळ

By : Polticalface Team ,Sun Sep 25 2022 00:30:18 GMT+0530 (India Standard Time)

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग नजरकैदेत? सुब्रमण्यम स्वामी यांच्या ट्विटने खळबळ नवी दिल्ली : चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना नजरकैदेत ठेवल्याची बातमी सोशल मीडियावरून जोरदार व्हायरल झाली आहे. त्यानंतर ट्विटरवर # XiJinping या नावाने हॅशटॅग देखील सुरू झाला आहे. त्यामुळे सध्या एकच खळबळ उडाली आहे.

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना सत्तेतून पायउतार करण्यासाठी त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात येतोय. शी जिनपिंग हे उजबेकिस्तानमध्ये समरकंद एससीओ समिटमध्ये असतानाच त्यांना सेनाध्यक्ष पदावरून हटवण्यात आले. त्यानंतर चीनमध्ये परतताच शी जिनपिंग यांना घरात नजरकैदेत ठेवण्यात आले, अशी चर्चा सध्या सुरू आहे.

तर या पार्श्वभूमीवर भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनीही या संदर्भात ट्वीट केल्याने खळबळ उडाली आहे. तसेच या सोशल मीडियावरील अफवांचे चिनी कम्युनिस्ट पार्टी किंवा सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सने खंडन केलेले नाही. त्यामुळे याबाबत नेमकं खरं काय ते अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
चीनच्या युजर्सने नेमकं काय दावा केला?:
चीनमधील काही सोशल मीडिया युजर्सने शी जिनपिंग यांना नजरकैदेत ठेवण्यात आल्याचा दावा केलाय. तर चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने जिनपिंग यांना राष्ट्राध्यक्षपदावरून हटवले असून सत्तेची सूत्र आपल्या हाती घेतल्याचा दावा देखील करण्यात आलाय. जिनपिंग यांच्यानंतर आता ली कियाओमिंग हे चीनचे नवीन राष्ट्राध्यक्ष बनणार असल्याचीही चर्चा सुरू आहे.


सुब्रमण्यम स्वामी यांचं ट्वीट काय?
चीन संदर्भात एक नवीन अफवा सुरू असून याची चौकशी करायला हवी. शी जिनपिंग खरंच नजरकैदेत आहेत का? असा सवाल सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विटद्वारे केला. शी जिनपिंग नुकतेच समरकंदमध्ये आले होते आणि त्याच दरम्यान चिनी कम्युनिस्ट पार्टीच्या नेत्यांना त्यांना सेनाध्यक्षपदावरून हटवले. यानंतर त्यांना घरातच नजरकैदेत ठेवण्यात आल्याची अफवा उडाली आहे, असे ट्वीट सुब्रमण्यम स्वामी यांनी केले आहे.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.

शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा

श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.

श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.

श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका

श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर

वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार

विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे

सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता

श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न

अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात

दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील

महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.

दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.

सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन

अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद