By : Polticalface Team ,Sun Sep 25 2022 10:33:18 GMT+0530 (India Standard Time)
शहरात सध्या रेल्वेच्या विद्युतीकरणाचे काम सध्या सुरू आहे. दिवसभर हिमायतनगर परिसरात काम करून हे मजूर परत टेम्पोमधून विद्युत लाईनचे साहित्य घेऊन भोकर येथे जात होते. या दरम्यान हिमायतनगर तालुक्यातील सोनारी फाटा येथे आयशर टेम्पोला भरधाव वेगातील सिमेंट घेऊन जाणाऱ्या ट्रकने जबर धडक दिली.
या अपघातात पाच मजुरांवर काळाने घाला घातला आहे, तर पाच जण गंभीर जखमी झालेत. यातील जखमींना सोनारी येथील युवकांनी बाहेर काढून सरसम प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी नांदेडला हलवलं. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच हिमायतनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बी. डी. भुसनूर व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. तालुक्यात राष्ट्रीय महामार्ग झाल्यापासून अपघाताचे प्रमाण वाढलं आहे. वाचक क्रमांक :