By : Polticalface Team ,Sun Sep 25 2022 10:36:13 GMT+0530 (India Standard Time)
लहान मुलांकडं कायम लक्ष देण्याची गरज असते. त्यांच्यावरील आपलं लक्ष थोडं जरी विचलित झालं तरी काय होऊ शकतं? याचा अंदाज आपल्याला या घटनेवरुन येईल. लहान मुलांना कोणतीही गोष्ट दिसली की, ते लगेच तोंडात घालतात. कधी-कधी वस्तू तोंडात घालणं चांगलचं धोक्याचं बनु शकतं. नाशिकमध्ये खेळता-खेळता एका आठ महिन्यांच्या मुलानं नेलकटर गिळलं.
नाशिकरोड परिसरातील के.जे. मेहता शाळा परिसरात ही घटना घडल्याचं समोर आलं. बाळानं नेलकटर गिळल्याचं लक्षात येताच पालकांनी त्याला आडगाव येथील मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल केलं. डॉक्टरांनी त्याच्यावर तत्काळ शस्त्रक्रिया करुन ते नेलकटर बाहेर काढलं. सुदैवानं मुलाला कोणतीही इजा झाली नव्हती. मुलाची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली.
बाळाला खेळायला सोडून आई त्याच्यापासून काहिशी दूर गेली. याचवेळी बाळानं खेळता-खेळता नेलटकर तोंडात घातलं. ते त्यानं गिळून घेतलं. बाळाला श्वास घ्यायला त्रास होत असल्याचं आईच्या लक्षात आलं. यानंतर आईने बाळाला तत्काळ रुग्णालयात दाखल केलं. यानंतर डॉक्टरांनी बाळावरती शस्त्रक्रिया केली.
डॉ. वसंतराव पवार मेडीकल कॉलेजमधील डॉक्टरांनी मुलास कुठलीही शारीरिक इजा होऊ न देता दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया केली. एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर नेलकटर बाहेर काढण्यात यश आलं. डॉक्टरांच्या तत्परतेनं या चिमुकल्याचा जीव वाचला आहे वाचक क्रमांक :