कर्जाची परतफेड करण्यापूर्वी कर्जदाराचा मृत्यू झाला तर काय होते?

By : Polticalface Team ,Sun Sep 25 2022 16:16:40 GMT+0530 (India Standard Time)

कर्जाची परतफेड करण्यापूर्वी कर्जदाराचा मृत्यू झाला तर काय होते? मुंबई : कर्जाची रक्कम भरण्यापूर्वी कर्जदाराचे निधन झाले तर ते पैसे कोण फेडणार? असा प्रश्न उपस्थित होतो. तर याचे उत्तर आहे कर्जदाराचे सह-कर्जदार, हमीदार किंवा कायदेशीर वारस. म्हणूनच फार काळजीपूर्वक विचार करूनच एखाद्याच्या कर्जाचे जामीनदार बनले पाहिजे.

एक गोष्ट लक्षात ठेवा की कर्जदार वेळोवेळी जामीनदार, कायदेशीर वारस किंवा सह-कर्जदाराचे नाव बदलू शकतो. जर जामीनदाराचीही इच्छा असेल तर तो स्वतः बँकेत जाऊन त्यात बदलासाठी अर्ज करू शकतो. तथापि, वैयक्तिक कर्जामध्ये मोठी सूट उपलब्ध आहे. हे कर्ज असुरक्षित वर्गात येत असल्याने, कर्जाची परतफेड करण्यापूर्वी कर्जदाराचे निधन झाल्यास कायदेशीर वारस किंवा कुटुंबातील सदस्यांकडून पैसे वसूल केले जात नाहीत.

वैयक्तिक कर्जासारख्या कर्जामध्ये, कोणतेही तारण म्हणजेच सुरक्षा देखील घेतली जात नाही, त्यामुळे बँक कर्जदाराची कोणतीही मालमत्ता जप्त करू शकत नाही. सरतेशेवटी, अशा कर्जाची रक्कम माफ केली जाते आणि बँक ती रक्कम एनपीए खात्यात टाकते. जर एखाद्या संयुक्त धारकाने कर्जाच्या कागदावर त्या कर्जदारासोबत अर्ज केला असेल, म्हणजेच दोन व्यक्तींनी मिळून कर्ज घेतले असेल, तर बँक पहिल्या कर्जदाराच्या मृत्यूनंतर दुसऱ्याकडून पैसे वसूल करते. हाच नियम क्रेडिट कार्ड कर्जांनाही लागू होतो.

आजकाल बहुतेक असुरक्षित कर्जे जसे की वैयक्तिक कर्जे विम्यासह येतात. यामध्ये, प्राथमिक कर्जदाराचा (पहिला कर्जदार) विमा उतरवला जातो. कर्जाच्या संपूर्ण परतफेडीच्या कालावधीपर्यंत विमा संरक्षण चालू राहते. दरम्यान, कर्जदारासोबत काही अनुचित प्रकार घडल्यास त्याचे कर्ज माफ केले जाते. यात असे होते की, ज्या विमा कंपनीकडून कर्जाचा विमा काढला जातो, त्या विमा कंपनीकडून बँक कर्जाचे पैसे घेते. या विम्याचे पैसे कर्जदाराला भरावे लागतात, जे अनेकदा एकाच वेळी भरले जातात.

जर पहिला कर्जदार कर्जाची परतफेड न करता मरण पावला, तर बँक प्रथम सह-अर्जदाराला पकडते. सह-अर्जदार कर्जाची परतफेड करण्यास सक्षम नसल्यास, बँक कुटुंबातील सदस्यांशी, कायदेशीर वारसांशी किंवा जामीनदारांशी संपर्क साधते. जर यापैकी कोणीही कर्जाची परतफेड करण्यास सहमत असेल, तर बँक त्यांच्याकडे असलेली मालमत्ता त्याच्या मालकाला परत करते. कर्जाची परतफेड करण्यास कोणी तयार नसेल, तर बँक मालमत्ता जप्त करून ती विकून कर्ज वसूल करते.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.

शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा

श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.

श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.

श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका

श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर

वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार

विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे

सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता

श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न

अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात

दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील

महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.

दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.

सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन

अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद