प्रहार जनशक्ती पक्ष आणि दिव्य समाज निर्माण संस्थेच्या माध्यमातून अनेक गोरगरीब मोतीबिंदू रुग्णांना मिळत आहे दृष्टी
By : Polticalface Team ,Sun Sep 25 2022 19:09:46 GMT+0530 (India Standard Time)
राजेगांव : २५ सप्टेंबर २०२२
आज राजेगांव मध्ये प्रहार जनशक्ती पक्ष आणि दिव्य समाज निर्माण संस्था यांच्या सयूंक्त विद्यमाने दिव्य समाज निर्माण संस्था कार्यालय येथे
मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर राबविण्यात आले .
या शिबीरामध्ये ४२ रुग्णांची तपासणी करण्यात आली .
१९ रूग्णांना शस्त्रक्रियासाठी पात्र करण्यात आले .
या शिबीरीमध्ये मोतीबिंदू आढळलेल्या रुग्णांची बुधराणी हॉस्पीटल पुणे येथे विना शुल्क शस्त्रक्रिया केली जाणार आहे.
प्रत्येक महिन्याच्या २५ तारखेला राजेगांव मध्ये शिबीर घेण्यात येत आहे. आजपर्यंत या भागातील हजारो रूग्णांना या शिबिराचा लाभ मिळाला आहे. ग्रामीण भागातील रुग्णांना शहरी भागात जाता येत नसल्याने या शिबिरामुळे परिसरातील गोर गरीब रुग्णांची मोठी सोय होत आहे. प्रहार जनशक्ती पक्ष आणि दिव्य समाज निर्माण संस्था आविरत पणे या भागातील गोरगरीब तसेच आरोग्यापासुन वंचीत असलेल्या रूग्णांना दृष्टी देण्याचे काम करीत आहे . रुग्णांचे मोफत ऑपरेशन झाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य पाहून खूपच आत्मिक समाधान लाभते .
यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे दोंड तालुका अध्यक्ष रमेश शितोळे - देशमुख ,बुधराणी हॉस्पीटलचे डॉ.गिरीश पाटील , गणेश वाघमारे , राजेंद्र कदम , भरत मोरे, अक्षय नांगरे उपस्थित होते.
वाचक क्रमांक :