By : Polticalface Team ,Sun Sep 25 2022 23:52:20 GMT+0530 (India Standard Time)
यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु टँकर चालक किरकोळ जखमी झाला असून, टँकरचे मात्र मोठे नुकसान झालेे. नगरहून शनिवारी सकाळी पाथर्डीकडे मळीची वाहतूक करणारा एक टँकर करंजी घाट उतरताना चालकाचे कौठीच्या वळणाजवळ टँकरवरील ताबा सुटल्याने पंधरा ते वीस फूट खोल दरीत कोसळला.
या अपघातामध्ये टँकर चालक किरकोळ जखमी झाला असून, टँकरचे मोठे नुकसान झाले. जंगलातील मोठ-मोठ्या झाडाझुडपाला टँकर अडकल्याने पुढील आणखी शंभर फूट खोल दरीत जाण्यापासून तो टँकर वाचला.
दरम्यान, टँकर कोसळल्याची माहिती मिळताच अनेक प्रवासी व ग्रामस्थांनी अपघातग्रस्त टँकरला पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती वाचक क्रमांक :