यवत येथे बैलपोळ्याच्या निमित्ताने, मानाची बैलजोडी सर्जा राजाची घरीच केले पुजन

By : Polticalface Team ,Mon Sep 26 2022 01:02:37 GMT+0530 (India Standard Time)

यवत येथे बैलपोळ्याच्या निमित्ताने, मानाची बैलजोडी सर्जा राजाची घरीच केले पुजन दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड, दौंड ता,२५/०९/२०२२, यवत येथे बैलपोळा पारंपारिक कार्यक्रमाला शेतकऱ्यांचा उस्फूर्तपणे प्रतिसाद, शासनाच्या आदेशानुसार लंपी स्किन डिसीज आजाराचा प्रादुर्भाव विविध ठिकाणी झपाट्याने वाढत चालला असल्याने नियंत्रण राखण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत, मात्र शेतकऱ्यांचा महत्त्वाचा सण बैलपोळा समजला जातो, सर्जा राजा बैलजोडीच्या जीवावर शेती अवलंबून आहे, वर्षभर शेतात काबाड कष्ट करून शेतकऱ्याचे कुटुंब जगवतो वर्षातून एक दिवस सर्जा राजासाठी म्हणजे बैलपोळा पारंपारिक कार्यक्रमाला कोणता शेतकरी शांत बसेल हा एक मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे, यवत येथील शेतकरी कुटुंबाने मानाच्या सर्जा राजा बैलजोडीला पुरण पोळीचा घास देऊन मोठ्या उत्साहाने खिल्लारी पंढरपुरी बैल जोडीचे घरीच पुजन करण्यात आले, या प्रसंगी यवत येथील वारकरी सांप्रदायातील शेतकरी बबनराव तात्या दोरगे यांच्या कुटुंबातील महिला भगिनींनी सर्जा राजा बैलजोडीचे पुजा करताना आपल्या भावना व्यक्त करत राज्यातील अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांच्या संदर्भात बोलताना म्हणाल्या, ईडा पिडा जाऊदे आणि बळीचे राज्य येऊदे, शेतकऱ्यांना सुखाचे दिवस यावेत अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
यवत येथील वारकरी सांप्रदायातील शेतकरी मा बबनराव तात्या दोरगे, यांचे अनेक वर्षापासून श्री संत चांगावटेश्वर महाराज यांच्या पालखी रथाला सर्जा राजा ही मानाची बैलजोडी असते, बैलपोळ्याच्या निमित्ताने या सर्जा राजा बैल जोडीला सजवण्यात आले होते, पूर्वीपासून ग्रामीण भागात बैलपोळ्याची परंपरा कायम राखत सर्जा राजा बैलजोडीला गावचे कुलदैवत श्री काळभैरवनाथ मंदिरा समोर व महालक्ष्मी मंदिर, या ठिकाणी गावातील सर्व शेतकरी आपल्या बैलजोडीची दक्षता घेऊन इतर बैलांमध्ये सुरक्षित अंतर ठेवून प्रदक्षिणा करण्यात आली, या वेळी मोरया डि जे हालगी पथक लाऊन फटाक्याच्या धुमधडाक्यात बैलपोळा साजरा करण्यात आला, यवत येथील शेतकऱ्यांनी बैलपोळ्याच्या निमित्ताने बैलजोडीचे घरी पुजा करण्यासाठी, मोठ्या किंमतीची देखणी व खिल्लारी पंढरपुरी बैलजोडी, ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य माजी उपसरपंच सदानंद दोरगे, यांनी खरेदी करून आणली होती, तसेच मलभारे वस्ती, खैरे वस्ती, चोभे मळा, दोरगे वाडी, वाघदरा, रावबाची वस्ती, सिंनगर मळा, येथिल शेतकऱ्यांनी सुरक्षित अंतर ठेवून मोरया डि जे हालगी पथक लाऊन फटाक्याच्या धुमधडाक्यात गुलाल भंडारा उधळून मोठ्या जल्लोषात बैलपोळा साजरा करण्यात आला, या प्रसंगी गावातील मान्यवर बबनराव तात्या दोरगे, माजी पंचायत समिती सदस्य,कुंडलिक नाना खुटवड, ग्रामपंचायत विद्यमान सदस्य माजी उपसरपंच सदानंद दोरगे, दिलीप शेठ यादव, ग्रा,पं, सदस्य गौरव दोरगे, कमुभाई तांबोळी, मंगेश रायकर, आदींसह गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते, यवत गावातील शेतकरी बबनराव तात्या दोरगे, यवत पंचक्रोशीतील प्रख्यात खिल्लारी पंढरपुरी सर्जा राजाची बैल जोडी आवडीने संभाळण्यात व संगोपन करण्यात मोठे हौशी व्यक्तिमत्व असणारे आणि परीसरात नावलौकिक असुन वारकरी संप्रदायाचे कुटुंब म्हणून पाहिले जाते, यांच्याकडे कायम खिल्लारी पंढरपुरी बैलांची जोडी (बैलगाडी) शेती कामाचे आवजरे आजही आहेत, बबनराव तात्या दोरगे यांच्या कुटुंबीयांनी वारकरी संप्रदायाची परंपरा जपत, पालखी सोहळ्यात संत चांगावटेश्वर महाराज यांच्या पालखी रथाला खिल्लारी पंढरपुरी बैल जोडीचा मान प्राप्त आहे, तसेच दोरगेवाडी येथील युवा तरुणांच्या मोठ्या उत्साहाने खिल्लारी पंढरपुरी बैल शौकीन तरुण युवकांनी बैल पोळ्याच्या निमित्ताने यवत गावात बैलपोळ्याच्या निमित्ताने सुरक्षित अंतर ठेवून बैल जोडींच्या पुढे शेवागिरी हालगी वाद्यांचा दणदणाट फटाक्यांच्या धुमधडाक्यात बैलपोळा साजरा करण्यात आला, तसेच बैलपोळ्याच्या निमित्ताने दोरगेवाडी येथील ग्लास ग्रुपचे युवा कार्यकर्त्यांनी दिनांक २६/०९/२०२२, रोजी सा,८ वा, गौतमी पाटिल यांचा ऑर्केस्ट्रा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे सुहाना गोडाऊन शेजारील मैदानात होणार असल्याची गावात प्रसिद्ध करण्यात आली आहे, त्यामुळे उद्याच्या कार्यक्रमात प्रामुख्याने युवा तरुण कार्यकर्ते, डोक्यावर टोपी तोंडात पान, पाटील गातोय गाणं, बाई वाड्यावर या) या लोकगीताचा आनंद मोठ्या जल्लोषात घेणार असल्याचे बोलले जात आहे, अशा प्रकारे यवत येथील बैलपोळ्याच्या निमित्ताने कार्यक्रम साजरा होणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही,

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.