दौंड तालुक्यातील भिमा नदीपात्रात पूर्व पश्चिम भागात वाळु माफीयांची दहशत महसुल विभागाचे जाणिवपूर्वक दुर्लक्ष
By : Polticalface Team ,Mon Sep 26 2022 11:09:30 GMT+0530 (India Standard Time)
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड,
दौंड ता २५/०९/२०२२, दौंड तालुक्यातील वाळु माफीयांनी पुन्हा जोमाने अवैध वाळू उपसा करण्यास सुरुवात केली आहे, दौंड तालुक्यातील पूर्व पश्चिम भागात खळबळ माजली आहे रात्रंदिवस भीमा नदी पात्रातून व गाव खेड्यातुन ओढे नाले व शेत जमीनीतुन गौण खनिज उत्खनन सुरू आहे पूर्व भागात देऊळगाव राजे, पेडगाव, शिक्रापूर, हद्दीतील भीमा नदी पात्रातून वाळू उपसा होतोय तर पश्चिम भागातून डाळींब परीसरात ठिक ठिकाणी शेतकरी पीकं घेण्या ऐवजी शेतातील चक्क गौण खनिज उत्खनन करण्यासाठी वाळू माफियांच्या गळाला लागत असल्याचे बोलले जात आहे, पश्चिम भागातील महसूलच्या यवत मंडल कार्यक्षेत्रात वाळू माफियांच्या जाळ्यात अडकले मंडल अधिकारी संदिप लोढे यांची तातडीने बदली करण्यात आली होती, मात्र त्या ठिकाणी प्रभारी मंडल अधिकारी येडे भाऊसाहेब यांची तात्पुरती एक महिन्याच्या कालावधी पर्यंत नेमणूक करण्यात आली होती, मात्र अद्याप कार्यक्षम कर्तव्यदक्ष मंडल अधिकारी या भागात उपलब्ध होऊ शकेल नाहीत महसूल विभागाची व्यवस्था डळमळीत असल्याने या भागातील वाळू माफियांचे फावले आहे, त्यामुळे यवत मंडल कार्यक्षेत्रात प्रभारी अधिकारी किती दिवस राहणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे, या ठिकाणी महसूल अधिकारी म्हणून कार्यक्षम व कर्तव्यदक्ष मंडल अधिकारी गाव कामगार तलाठी असणे काळाची गरज असल्याची ठिक ठिकाणी चर्चा होत आहे, दौंड तालुका पश्चिम भागात कार्यक्षम महसूल अधिकारी नसल्याने
वाळू माफिया राजरोसपणे माती मिश्रित वाळूचे उत्खनन करणे जोमात सुरू आहे, मात्र त्यामुळे इतर ठिकाणच्या काही प्रामाणिक महसूल कर्मचाऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे,
दौंड तालुक्यातील पूर्व भागात भीमा नदी पात्रातून रात्रीच्या वेळी फायबर बोटीच्या साह्याने वाळू उपसा करुन वाळू डंपर वाहनात भरून दौंड शहरातूनच वाहतूक केली जात आहे, वाळू वाहनात दिसू नये म्हणून हायवा डंपरचा वापर माफी यांनी सुरू केला आहे, मागील काळात दौंड महसूल विभाग व पोलीस प्रशासनाने संयुक्त कारवाई केल्याने वाळू माफियांचे धाबे दणाणले होते, मात्र काही काळ थांबलेला वाळू उपसा पुन्हा एकदा जोमाने वाढत चाललेला दिसून येत आहे, दौंड तालुक्यातील पश्चिम भागात ओढे नाले पडीक शेतजमीनीतील माती मिश्रित वाळूचे उत्खनन सुरू आहे, तर पूर्व भागात भीमा नदीच्या पात्रातील गौण खनिज, वाळू माफिया नेमके कोणाच्या आशीर्वादाने लुटमारीचा गोरख धंदा चालवत आहेत, ? हा सर्व प्रकार दौंड महसूल विभाग व पोलीस प्रशासनाला अंधारात ठेवून उपक्रम राबविला जात आहे,? की (जानकर भी अंजान) असा सवाल उपस्थित केला जात आहे, यामध्ये खरंच सत्य असेल तर दौंड महसूल व पोलीस प्रशासनाने दखल घेऊन तत्काळ कारवाई होईल का? याकडे सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे,
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.
शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा
श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.
श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.
श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका
श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर
वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार
विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे
सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता
श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न
अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात
दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील
महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.
दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.
सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन
अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद