....तर खाली उतरून एक घाव दोन तुकडे केले असते - आमदार संतोष बांगर

By : Polticalface Team ,Mon Sep 26 2022 15:03:40 GMT+0530 (India Standard Time)

....तर खाली उतरून एक घाव दोन तुकडे केले असते - आमदार संतोष बांगर हिंगोली : शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्या गाडीवर रविवारी अमरावतीत शिवसैनिकांनी हल्ला केला. या घटनेनंतर बांगर यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, त्यावेळी गाडीत माझ्यासोबत माझी बहीण आणि पत्नी नसत्या तर मी खाली उतरून संतोष बांगर काय आहे? हे दाखवून दिले असते. एक घाव दोन तुकडे केले असते. दरम्यान बांगर यांची गाडी अडवणाऱ्या 15 ते 20 व्यक्तींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संतोष बांगर हे कुटुंबीयांसोबत अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथे देवदर्शनासाठी गेले असताना हा हल्ला झाला. बांगर म्हणाले, मला वाटतं की याला हल्ला म्हणता येणार नाही, हल्ला कशाला म्हणतात? समोर येऊन कुणी वार करत असेल तर त्याला आपण हल्ला म्हणतो. मात्र हे ठरवून केलेले एक षडयंत्र असल्याचा दावा त्यांनी केला. या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्यासोबत फोनवरून संवाद साधल्याचे देखील त्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर पुढील निर्णय घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

रविवारी संतोष बांगर अमरावतमध्ये आले होते. यावेळी शिवसैनिकांकडून रस्त्यात बांगर यांच्या गाड्यांचा ताफा अडवून हल्ला करण्यात आला. बांगर यांच्या ताफ्यातील पोलिसांची गाडी पुढे जाताच एक शिवसैनिक त्यांच्या गाडीला आडवा आला. बांगर बसलेल्या ठिकाणी गाडीच्या काचेवर शिवसैनिकांनी हाताने जोरात फटके मारले. दरम्यान, गाडीच्या चालकाने प्रसंगावधान राखत गाडी पुढे नेली.

काही दिवसांपूर्वीच बांगर यांनी “माझ्या गाडीला कुणी स्पर्शही केला तरी आम्ही त्यांना सोडणार नाही” अशा आशयाचं वक्तव्य केलं होतं. दरम्यान, रविवारी त्यांच्या गाडीवर हल्ला झाल्यानंतर त्यांना याबाबत विचारलं असता बांगर म्हणाले की, आजही मी तुम्हाला सांगतो, ज्या मतावर बोललो होतो, त्यावर मी ठाम आहे. आजही माझ्या गाडीला स्पर्श करून दाखवा, हा संतोष बांगर जे बोललाय ते केल्याशिवाय राहणार नाही

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.

शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा

श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.

श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.

श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका

श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर

वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार

विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे

सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता

श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न

अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात

दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील

महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.

दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.

सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन

अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद