By : Polticalface Team ,Mon Sep 26 2022 21:39:04 GMT+0530 (India Standard Time)
राज्य निवडणूक आयोगाने 07 सप्टेंबर रोजी 1 हजार 166 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. त्यात सदस्यपदांसह थेट सरपंचपदाचाही समावेश आहे. त्यात आता काहीसा बदल केला आहे.
आता 16 ऑक्टोबरला सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होणार आहे. नक्षलग्रस्त भागात दुपारी 3 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असणार आहे. तर 17 ऑक्टोबरला निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. मतमोजणीची वेळ आणि ठिकाण संबधित तालुक्याचे तहसीलदार जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने ठरवणार आहेत वाचक क्रमांक :