ठाकरे गटाला धक्का! पक्षचिन्हाबाबात निर्णय निवडणूक आयोग ठरवणार

By : Polticalface Team ,Tue Sep 27 2022 17:13:59 GMT+0530 (India Standard Time)

ठाकरे गटाला धक्का! पक्षचिन्हाबाबात निर्णय निवडणूक आयोग ठरवणार मुंबई : आज कोर्टाने निवडणूक आयोगाच्या कामकाजात मध्यस्थी करण्यास नकार दिला. यामुळे पक्षचिन्हाबाबत निर्णय घेण्यासाठी निवडणूक आयोगाचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे शिंदे गटाला दिलासा तर ठाकरे गटाला धक्का मानला जात आहे. यामुळे निवडणूक आयोग काय निर्णय देते? कधी निर्णय देते? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे

आता धनुष्यबाण हे चिन्ह टिकवण्यासाठी ठाकरे गटाची सर्व लढाई निवडणूक आयोगाच्या दारात येऊन ठेपली आहे. आपणच खरी शिवसेना असल्याचा शिंदे गटाचा दावा असून, निवडणूक आयोगाला यासंबंधी निर्णय घेण्यापासून रोखलं जावं अशी ठाकरेंच्या वतीने मागणी करण्यात आली होती. ठाकरे गटाची हीच मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळल्याने त्यांना मोठा धक्का मानला जात आहे.

महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर पाच सदस्यीय घटनापीठापुढे सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. आज सर्वात अगोदर शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी यांनी घटनापीठापुढे युक्तिवाद केला. त्यानंतर ​​​​​​शिंदे गट, निवडणूक आयोग आणि राज्यपालांच्या वतीने वकिलांनी युक्तिवाद करण्यात आला.

शिंदे गट 19 जुलैला निवडणूक आयोगात गेला. मात्र शिंदे गट कोणत्या भूमिकने, कोणत्या अधिकाराने निवडणूक आयोगात गेला? विधीमंडळ पक्षाचा सदस्य की, राजकीय पक्षाचा सदस्य म्हणून? शिंदेंचं सध्याचं स्टेटसं काय? शिंदेच्या सदस्यत्वार प्रश्न असल्याचा युक्तिवाद ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल यांनी केला.

संख्याबळ नसताना शिवसेनेने व्हीप बजावला. बहुमत नसताना एकनाथ शिंदेंना गटनेतेपदावरुन हटवले गेले, मात्र असे करता येत नाही. त्यामुळे शिंदे गटाला दिलेली अपात्रतेची नोटीस वैध नाही, असा युक्तिवाद शिंदे गटाच्यावतीने अ‌ॅड. निरज कौल यांनी केला.

अ‌ॅड. अरविंद दातार यांनी निवडणूक आयोगाची बाजू मांडली. दातार म्हणाले, निवडणूक आयोग ही घटनात्मक संस्था असून आमचे काम हे विधानसभा अध्यक्षांच्या कामापेक्षा वेगळे आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींचा निवडणूक आयोगाच्या कामकाजावर परिणाम होत नाही.

राज्यपालांची बाजू अ‌ॅड. तुषार मेहता यांनी मांडली. मेहता म्हणाले, कोणती शिवसेना खरी याचे उत्तर आयोगाला द्यायचे आहे. आयोगाला त्यांचे काम करु दिले पाहीजे. पक्ष व चिन्हाबाबत निर्णय घेण्याची परवानगी निवडणूक आयोगाला द्यावी

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड नगरपरिषद निवडणूक प्रचार सभा जोरदार. मी कामाचा माणूस आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार.

दौंड नगरपरिषद निवडणूक प्रचार सभा जोरदार. मी कामाचा माणूस आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार.

दौड शुगर साखर कारखान्यात एका उस वाहनाचे दोन वेळा वजन करून आर्थिक फसवणुक प्रकरणी ऋषिकेश गिरीधर चैंडे याचे विरुद्ध गुन्हा दाखल.

ओंकार साखर ग्रूप कर्मचाऱ्यांसाठी २०% पगारवाढ जाहीर.चेअरमन मा.श्री.बाबुराव बोत्रे पाटील.

दौंड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 दौंड शहरातील मतदार जन जागृती पथनाट्याने नागरिकांचे लक्ष वेधले

कुरकुंभ येथील देवांश पान शॉप टपरीच्या आडोशाला देशी दारू टँगो पंच विक्री अट्यावर पोलिसांची कारवाई आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

यवत ग्रामपंचायत कार्यालयात आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे. आदर्श पिता रामजी बाबा आंबेडकर. पंडित जवाहरलाल नेहरू. महापुरुषांची जयंती साजरी.

देवदर्शन यात्रेला गेलेल्या बसचा भीषण अपघात 20 महिला जखमी

श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक महा विकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार

श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक महा विकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार

श्रीगोंदा नगरपालिका निवडणुक महाविकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार

श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सुरू. यवत नगरी हरिनामाने झाली भक्तीमय

नगराध्यक्ष पदासाठी इंद्रायणी पाचपुते चर्चेत ? श्रीगोंदा नगरीत वातावरण वातावरण सस्पेन्स .!

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न