By : Polticalface Team ,Tue Sep 27 2022 18:27:01 GMT+0530 (India Standard Time)
श्रीगोंदा : दि . 07/08/2022 रोजी फिर्यादी शिवाजी वसंत क्षिरसागर वय 33 वर्ष रा . राशिन , ता . कर्जत जि . अहमदनगर यांनी फिर्याद दिली होती की , दि . 06/08/2022 रात्री 10.30 वा.चे सुमारास यातील फिर्यादी हे शिरुर येथुन आठवडे बाजारातून फरसाण विक्री करुन त्यांचे मालकीचे मालवाहू टाटा झीप गाडीने घरी राशिन ला येत असताना पारगाव ता. श्रीगोंदा येथे आला असता कोणीतरी अज्ञात इसमांनी गाडीला मोटार सायकल आडवी लावुन फिर्यादी व साक्षीदार यांना मारहाण करुन खिशातील पैसे मोबाईल बळजबरीने काढुन जबरी चोरी केली. श्रीगोंदा पोलीस स्टेशन गु.रजि नं .611 / 2022 भा.द.वि.क 394,341 , 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हयाचा तपास चालु असताना रामराव ढिकले पोलीस निरीक्षक श्रीगोंदा पोलीस स्टेशन यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व कर्मचारी यांना सदर गुन्ह्याबाबत योग्य त्या सुचना देवून मार्गदर्शन केले.
गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांनी तांत्रिक तपास करुन दि . 25/09/2022 संशयित इसम नामे 1) सचिन बाळासाहेब कोल्हे वय 23 वर्षे रा.विट ता.करमाळा 2) आप्पासाहेब काशीनाथ सोलंकर वय 27 वर्षे , रा. करपडी, राशिन, ता. कर्जत ह.रा.कारेगाव ता . शिरुर 3 ) चेतन साहेबराव सांगळे वय 20 वर्षे रा .करंजी ता . पाथर्डी ह.रा.कारेगाव ता.शिरुर 4 ) सोनल साहेबराव चव्हाण वय 22 वर्षे रा.गवखेल ता.आष्टी जि.बीड ह.रा. कारेगाव ता. शिरुर यांना कारेगाव येथुन ताब्यात घेऊन त्यांना गुन्ह्यात अटक करुन मा. न्यायालकडुन पोलीस कोठडी रिमांड घेउन संशयितांकडे कसुन चौकशी केली असता त्यांनी वरील गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपीतांकडुन सदर गुन्ह्यात चोरीस गेलेले मोबाईल व गुन्ह्यात वापरलेल्या दोन मोटारसायकल. 1) 10,000/- रु.कि.चे. एम.आय कंपनीचा ए 3 मॉडेलचा निळ्या रंगाचा मोबाईल त्याचा आय.एम.ई.आय.नं. 866320047399931 2) 15,000 /- रु.किं.चे.विवो कंपनीचा वाय 21 मॉडेलचा सिल्वर रंगाचा मोबाईल त्याचा आय.एम.ई.आय नं . 863035067967697 3 ) 50,000 /- रु . किं . चे काळ्या रंगाची यमाहा कंपनीची फेजर मॉडेलची एम.एच .37 एन . 0844 4 ) 50,000 / -रु . किं.चे लाल काळे रंगाची बजाज कंपनीची पल्सर विना नंबरची एकुण 1,25,000 / - ( एक लाख पंचवीस हजार रुपये ) रु . किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी मा. आण्णासाहेब जाधव व पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग हे करीत आहेत सदर आरोपी हे पोलीस कस्टडी मध्ये असुन त्यांचेकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
वरील उत्कृष्ट कामगिरी पोलीस अधिक्षक मा.मनोज पाटील साहेब, अप्पर पोलीस अधिक्षक मा . सौरभकुमार अग्रवाल साहेब , उपविभागीय पोलीस अधिकारी मा. अण्णासाहेब जाधव साहेब यांचे मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले, पोसई समीर अभंग , पोसई प्रदिप बो-हाडे , सफ अंकुश ढवळे ( SDPO कार्या ) , पोना गोकुळ इंगवले , पोका प्रकाश मांडगे , पोकॉ किरण बोराडे , पोकॉ दादासाहेब टाके , पोकॉ अमोल कोतकर , पोकॉ रविंद्र जाधव , पोकों प्रशांत राठोड यांनी केली आहे . वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड नगरपरिषद निवडणूक प्रचार सभा जोरदार. मी कामाचा माणूस आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार.
दौंड नगरपरिषद निवडणूक प्रचार सभा जोरदार. मी कामाचा माणूस आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार.
दौड शुगर साखर कारखान्यात एका उस वाहनाचे दोन वेळा वजन करून आर्थिक फसवणुक प्रकरणी ऋषिकेश गिरीधर चैंडे याचे विरुद्ध गुन्हा दाखल.
ओंकार साखर ग्रूप कर्मचाऱ्यांसाठी २०% पगारवाढ जाहीर.चेअरमन मा.श्री.बाबुराव बोत्रे पाटील.
दौंड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 दौंड शहरातील मतदार जन जागृती पथनाट्याने नागरिकांचे लक्ष वेधले
कुरकुंभ येथील देवांश पान शॉप टपरीच्या आडोशाला देशी दारू टँगो पंच विक्री अट्यावर पोलिसांची कारवाई आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल
यवत ग्रामपंचायत कार्यालयात आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे. आदर्श पिता रामजी बाबा आंबेडकर. पंडित जवाहरलाल नेहरू. महापुरुषांची जयंती साजरी.
देवदर्शन यात्रेला गेलेल्या बसचा भीषण अपघात 20 महिला जखमी
श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक महा विकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार
श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक महा विकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार
श्रीगोंदा नगरपालिका निवडणुक महाविकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार
श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सुरू. यवत नगरी हरिनामाने झाली भक्तीमय
नगराध्यक्ष पदासाठी इंद्रायणी पाचपुते चर्चेत ? श्रीगोंदा नगरीत वातावरण वातावरण सस्पेन्स .!
स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?
भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती
श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.
कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न