साकळाईच्या सर्व्हेक्षणास मान्यता.
2023 मध्ये कार्यवाही सुरू होणार खा.डॉ सुजय विखे यांची माहिती.
By : Polticalface Team ,Tue Sep 27 2022 20:14:10 GMT+0530 (India Standard Time)
नगर- डॉ सुजय विखे यांच्या लोकसभा निवडणुक प्रचारासाठी 16 एप्रिल 2019 ला वाळकी ता.नगर येथे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा झाली होती.त्यावेळी साकळाई पाणी योजना पूर्ण करू असे आश्वासन फडणवीस यांनी दिले होते.भाजपा - शिंदे सेनेचे सरकार येताच खा.डॉ सुजय विखे यांनी साकळाई प्रकरणाचा पाठपुरावा सुरू केला.त्यामुळे आज मुंबई येथे झालेल्या बैठकीत साकळाई च्या सर्व्हेक्षणास मान्यता देण्यात आली आहे. पुढील वर्षी साकळाई च्या कार्यवाहीस सुरुवात होणार आहे अशी माहिती खासदार डॉ सुजय विखे यांनी दिली आहे.
साकळाई पाणी योजना ही श्रीगोंदा, नगर तालुक्यातील जिरायत भागासाठी वरदान ठरणारी आहे. गेले 35 वर्षांपासून तिची मागणी होत आहे .प्रत्येक निवडणुकीत फक्त आश्वासने दिली जात होती पण पाणी योजना मंजूर होत नव्हती. डॉ सुजय विखे यांनी या कामी सुरुवातीपासूनच प्रामाणिक पणे प्रयत्न सुरू केले होते.मागील भाजपा- शिवसेना सरकार काळातही त्यांनी मुंबईत अनेक वेळा बैठका ही घेतल्या होत्या.आता पुन्हा भाजपा चे सरकार येताच खा.डॉ सुजय विखे यांनी पुन्हा जोरदार सक्रियता दाखवली उपमुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांकडे पाठपुरावा सुरू केला.आज मुंबई येथे उपमुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस, खा.डॉ सुजय विखे,खा. सदाशिव लोखंडे, आमदार बबनराव पाचपुते, माजी आमदार शिवाजीराव कर्डीले , जलसंपदा सचिव, सचिव लाभ क्षेत्र विकास, मुख्य अभियंता कुकडी आणि इतर अधिकाऱ्यांची बैठक झाली.या बैठकीत साकलाई पाणी योजनेच्या सर्व्हेक्षणास मान्यता देण्यात आली.
15 ऑक्टोबर पर्यत या सर्व्हेक्षण निविदा अंतिम होणार असून.डिसेंबरअखेर सर्व्हेक्षण पूर्ण करण्यात येऊन आराखडा सादर करण्याचा सूचना या बैठकीत जलसंपदा खात्याला देण्यात आल्या आहेत.डिसेंबर 2022 नंतर चौथ्या सुधारित प्रशासकीय आराखड्यात साकळाई योजनेचा समावेश करण्यासही या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. पुढील 2023- 24 अर्थ संकल्पात त्यासाठी निधी मंजूर केला जाणार आहे.याबरोबरच डिंभे धरण ते माणिकडोहो अंतर्गत बोगद्यास मान्यता देण्यात आली आहे.तसेच कुकडी डावा कालव्याच्या प्रस्तावित मूळ क्षमतेने वाहता करण्यासाठी विशेष दुरुस्ती निधीसही मान्यता देण्यात आली आहे.त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी बचत होत येडगाव धरणातील पाणी साठा वाढून त्याचा फायदा मोठ्या क्षेत्राला मिळणार आहे.साकळाई मार्गी लागल्यामुळे नगर आणि श्रीगोंदा तालुक्यातून आनंद व्यक्त केला जात आहे.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.
शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा
श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.
श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.
श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका
श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर
वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार
विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे
सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता
श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न
अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात
दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील
महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.
दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.
सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन
अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद