By : Polticalface Team ,Tue Sep 27 2022 22:43:30 GMT+0530 (India Standard Time)
नेहा यांनी जॉर्जिया इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीतून कम्प्युटर सायन्सचं शिक्षण घेतलं. त्या कंफ्लुएंट च्या सह संस्थापक आहेत. त्याचबरोबर आपाचे काफ्का जी एक ओपन सोर्स मेसेजिंग सिस्टम आहे, ती डेव्हलप करण्यात त्यांची मोठी भूमिका होती. सध्या त्या अनेक टेक्निकल कंपन्यांत सल्लागार आणि गुंतवणूकदार म्हणून कार्यरत आहेत.
हारुन इंडिया रिच लिस्टमध्ये नेहा यांना 336 वे स्थान मिळाले आहे. त्यांची अंदाजे संपत्ती तब्बल १३ हजार ३८० कोटी रूपये एवढी आहे. स्वतःची कंपनी सुरू करण्याअगोदर नेहा लिंक्डइन आणि ओरॅकलसाठी काम करत होत्या. अपाचे काफ्का सॉफ्टवेयर बनवणाऱ्या टीमचा भाग होत्या. 2014 मध्ये त्यांनी स्वतःची कंपनी सुरू केली.
फोर्ब्सच्या स्वयंसहाय्यित श्रीमंत महिलांच्या यादीत नेहाने 57 वे स्थान मिळवले आहे. 2018 मध्ये फोर्ब्सने टेक्नॉलॉजी संबंधित महिलांच्या यादीत नेहा यांचं नाव समाविष्ट केले. हुरुन इंडियानुसार या यादीत 1000 कोटीहून अधिक संपत्ती असलेले एकुण 1103 लोक समाविष्ट करण्यात आले होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत या यादीत यावर्षी 96 लोक वाढवण्यात आले. वाचक क्रमांक :