By : Polticalface Team ,Wed Sep 28 2022 13:57:22 GMT+0530 (India Standard Time)
श्रीगोंदा पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे पोलिसांनी घटनास्थळी जाऊन दोन संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी केली असता त्यांचे गावाचे नाव प्रत्येक वेळेस वेगवेगळे सांगत आहेत.
सध्या राज्यात मूल पळवणारी टोळी समजून जमावाने हल्ला केल्याच्या अनेक घटना घडत असतानाच आज श्रीगोंदा तालुक्यातील देखील तशीच घटना घडली आहे. सदर दोघे संशयित व्यक्ती काष्टी कडून अजनूज कडे जात असताना त्यांनी रस्त्याने चाललेल्या शाळकरी मुलाला गाडीत बसवले त्यानंतर त्याचे घरजवळ आल्यानंतर त्यांनी त्या मुलाकडे पैसे मागत त्याला घाबरवायला सुरुवात केली सदर मुलाने याबाबत गावात त्याच्या नातेवाईकांना माहिती दिल्यानंतर मोठा जमाव जमला त्यांनी या दोघा संशयितांना जबर मारहाण करत त्यांची स्विफ्ट गाडी देखील फोडली
पोलिसांना याबाबत माहीती मिळाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक अभंग,स.फौ अंकुश ढवळे,पो कॉ किरण बोराडे,पो कॉ प्रताप देवकाते,पो ना भरत इंगवले,रवि जाधव हे पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले त्यांनी प्रसंगावधान राखत जमावाला शांत करत सदर संशयितांना ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस करत आहेत. वाचक क्रमांक :