By : Polticalface Team ,
हा व्हिडिओ अचलपूर तालुक्यातल्या गणोजा गावातील आहे. बच्चू कडू हे अमरावतीच्या अचलपूर तालुक्यातल्या गणोजा गावात उद्घाटनासाठी गेले होते. त्यावेळी कामकाजासंदर्भात त्यांचा वादविवाद झाला. दरम्यान यावेळी राग अनावर झाल्याने बच्चू कडूंनी स्वतःच्याच कार्यकर्त्याच्या कानशिलात लगावल्याचे माहिती समोर येत आहे.
आमदार बच्चू कडू हे नेहमीच विविध कारणामुळे चर्चेत असतात. अनेकदा त्यांच्या वर्तनाचे कार्यकर्त्यांना कौतुक वाटते. तर कधी प्रसारमाध्यमांतून ते टीकेचे धनी होतात. शेतकरी, अपंग, दिव्यांग आदी नागरिकांच्या मुद्द्यावरुन ते नेहमी आक्रमक दिसत असले तरी, त्यांच्या वर्तनामुळेही ते अनेकदा चर्चेत असतात. आता कार्यकर्त्याच्या कानशिलात लगावल्याने ते चर्चेत आले आहे. वाचक क्रमांक :