By : Polticalface Team ,Thu Sep 29 2022 19:07:59 GMT+0530 (India Standard Time)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय झालाय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते. सततच्या पावसाने बाधित, पण 65 मिलीमीटरच्या निकषात न बसणाऱ्या आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आणखी ६ लाख शेतकऱ्यांना ७५५ कोटींची मदत या बैठकीत मंजूर करण्यात आली. निकषात बसणाऱ्या 30 लाख शेतकऱ्यांना ₹३६०० कोटी यापूर्वीच वितरित करण्यात आले आहेत.
आता आणखी ६ लाख शेतकऱ्यांना ७५५ कोटी मदत मिळणार आहे. ही मदत निकषात बसत नव्हती. मात्र विशेष बाब म्हणून आज मंत्रिमंडळ उपसमितीने मंजुरी दिली.यामुळे आणखी ५ लाख ४९ हजार ६४६ हेक्टर क्षेत्राला लाभ मिळणार आहे वाचक क्रमांक :