कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या उपोषणाला पाठिंबा देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगर दौंड राष्ट्रीय महामार्गावर तीव्र आंदोलन
By : Polticalface Team ,Thu Sep 29 2022 20:38:01 GMT+0530 (India Standard Time)
लिंपणगाव( प्रतिनिधी )कांदा उत्पादकांच्या प्रश्ना संदर्भात कांद्याला 30 रुपये हमी भाव मिळावा यासाठी तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी गेल्या चार दिवसापासून श्रीगोंदा येथील तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. या शेतकऱ्यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने ढोकराई फाटा येथील नगर दौंड रस्त्यावर तीव्र रस्ता रोको आंदोलन छेडण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम अण्णा शेलार यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाले की, कांद्याला हमीभाव देत असताना केंद्र सरकारने त्या भाववाढी संदर्शाभात हस्तक्षेप केला नाही पाहिजे. कांद्याला 30 रुपये भाव मिळावा अशी मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांची आहे. ती रास्ता आहे. कांद्याचे भाव कोसळले म्हणजे हे केंद्र सरकारचे अपयश म्हणावे लागेल. अच्छे दिनचा नारा देणारे नरेंद्र मोदी हे पंतप्रधान होण्याच्या अगोदर रासायनिक खताच्या किमती 200 होत्या त्या गगनाला भिडल्या. हेच का? त्यांचे अच्छे दिन त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसेंदिवस वाढणाऱ्या रासायनिक खतांच्या किमती त्यामुळे शेती करणे तितकेच अवघड बनल्याचे शेलार यांनी सांगून केंद्र व राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले. आंदोलन स्थळी श्रीगोंदाच्या नायब तहसीलदार योगिता ढोले यांनी आंदोलनकर्त्यांचे आंदोलन स्वीकारले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने देण्यात आलेल्या तहसीलदारांना निवेदनात पुढे म्हटले आहे की, कांदा पिके नगदी उत्पन्न देणारे पिक असुन, शेतकरी कांदा उत्पादन करण्यासाठी खुप मेहनत घेउन खर्च करून कांदयाचे उत्पादन करत असतो. मात्र ज्यावेळी शेतकरी बाजारात कांदा विक्रीसाठी आणतो, त्यावेळी कवडीमोल भावाने कांदयाची खरेदी केली जाते...
यावर्षी प्रजन्यमान जास्त दिवस सुरू असल्याने शेतक-यांनी वखारीत ठेवलेला कांदा ५० टक्के पेक्षा जास्त खराब झालेला असुन, जास्तीच्या पावसामुळे शेतक-यांची कांदा रोपे पुर्णपणे खराब झालेली आहेत. त्यामुळे नवीन लागण देखील झालेली नाही. असे असताना देखील शेतक-यांना निच्चांकी दराने कांदा विकावा लागत आहे. हे वेळ शेतक-यांवर नेहतीच येते. वर्षातील १० ते २० दिवस कांदयाला बरा बाजार मिळतो, त्यावेळी लगेच ओरड होते आणि सरकार यात हस्तक्षेप करून बाजार कमी करते हा शेतक-यांवर घोर अन्याय आहे.
कांदयाला बाजार ३० रूपयांपेक्षा कमी होणार नाही. यासाठी सरकारने निश्चित धोरण ठरवून कांदयाला किमान ३० रू हमीभाव ठरवुन दयावा. व बाजारात मागणीनुसार कांदयाचे दर जर वाढले तर त्यात सरकारने कोणताही हस्तक्षेप करून नये. अशी मागणी करत श्री. पोपटराव माने रा. शेंडेवाडी, ता.श्रीगोंदा यांनी दि. २६/०९/२०२२ रोजी पासुन अमरण उपोषण सुरू केले असुन त्यांचे आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे. त्यांचे मागण्यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस श्रीगोंदा तालुक्याच्या वतीने पाठींबा देण्यात येत असुन त्यासाठी हे आजचे रास्ता रोको आंदोलन केलेले आहे.
कांदा उत्पादक शेतक-यांच्या मागण्या सरकारने त्वरीत मान्य कराव्यात व त्यांना आमरण उपोषणापासुन परावृत्त करावे, यासाठी हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आंदोलन होते या. आंदोलनात जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम अण्णा शेलार, माजी आमदार राहुल जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष हरिदास शिर्के, ओबीसी सेलचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय आनंदकर, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रीगोंदा अध्यक्ष ऋषिकेश गायकवाड आदींनी या आंदोलनात सहभाग घेऊन केंद्र सरकारवर टीकास्ता्र सोडले. यावेळी कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.