आदिनाथ कारखाना सुरु होण्याआधीच संचालक मंडळाने सुरु केला भ्रष्टाचार- दशरथ आण्णा कांबळे
By : Polticalface Team ,Fri Sep 30 2022 09:03:55 GMT+0530 (India Standard Time)
करमाळा-प्रतिनिधी
आदिनाथ सहकारी साखर कारखान्यामध्ये गेल्या तीन वर्षांपासून पडून असलेली साखर मोठ्या वाद-विवादानंतर कारखान्याच्या बाहेर पडू लागली. व त्या साखरेतून कारखान्यातील कर्मचाऱ्यांच्या पगारीचा काही प्रमाणात प्रश्न मिटणार, अशा प्रकारच्या अशा पल्लवीत सुद्धा झाल्या. परंतु या सर्व प्रकरणी संचालक मंडळाला कोणत्याच प्रकारे पैशावर डल्ला मारता येत नाही. हे कळून आल्यानंतर त्यांनी थेट व्यापाऱ्यांशी संपर्क साधून, सदरील रक्कमेसंदर्भात दोघांनी ही संगनमत करुन त्यातून लाखो रुपयाचा डल्ला, संचालक मंडळाने मारण्याचा कट रचला होता. अशा प्रकारच्या बातम्या व तालुक्यातून चर्चा सध्यातरी निर्माण झालेली आहे. आदिनाथ कारखाना हा सहकारी तत्त्वावर राहावा. या उद्देशाने बारामती ॲग्रोला विरोध केला गेला. व सहकारी तत्त्वावर चालावा, म्हणून कारखान्यातील सभासदांनी एकरी दहा हजार रुपये अनामत रक्कम जमा करावी. अशा प्रकारचे आवाहन आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी कार्यकारी संचालक हरिदास डांगे यांनी केले. व त्यानुसार अनेक सभासदांनी लाखो रुपयांच्या अनामत रकमा देण्यास सुरुवात केली. परंतु आदिनाथ कारखाना बंद पाडण्यासाठी कारणीभूत असलेले नारायण पाटील व सौ. रश्मी बागल-कोलते या दोघांनीही अद्याप त्यांच्या कोणत्याही रकमा कारखान्याकडे जमा केल्याचे पाहावयास मिळत नाही. बागल व पाटील यांनी कारखान्याकडे दोन-दोन कोटी रुपये जमा करावे. त्याचप्रमाणे कारखाना संचालकांनी त्यांच्या ऐपतीप्रमाणे अनामत रकमा जमा कराव्यात. त्याशिवाय तालुक्यातील जनतेला सुध्दा तुमचा विश्वास येणार नाही. फक्त फुकटचे आवाहन करण्यात काही अर्थ नाही. हरिदास डांगे यांनी सुरुवातीला एक कोटी रुपये देणार, अशा प्रकारे जाहीर केले होते. त्या रकमेचे काय झाले? हे त्यांनी स्पष्ट करावे. सौ.रश्मी बागल-कोलते व माजी आमदार नारायण पाटील यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन, आदिनाथ कारखान्यामधील कामगारांच्या पगारीचा प्रश्न कशाप्रकारे सोडविला जाईल हे एकदा स्पष्ट करावे.
कारण मा.आ.नारायण पाटील यांचा आदिनाथ कारखान्याबाबतीत भूतकाळ पहावा तेवढा प्रेरणादायक नाही. व कारखाना सुरू करण्या इतपत सर्वांनी आशा ठेवावी असा तर कदापि हि नाही. कारखाना सुरू असताना माजी आमदार नारायण पाटील हे कारखान्यातील सहा संचालक घेऊन बाहेर पडले होते. त्यावेळेस तर पाटील हे विद्यमान आमदार होते. व शिवसेना-भाजपाचे सरकार सुद्धा कार्यरत होते. त्यावेळेस ते कारखान्याला नवसंजीवनी देऊ शकत होते. परंतु त्यांचे राजकारण हे आमदारकी पुरते सुरू होते. पण आज त्यांच्याही राजकारणाची कुठेतरी डाळ शिजवण्याच्या उद्देशाने, त्यांनी स्वर्गीय गोविंद बापू पाटील यांच्या नावाचा वापर सुरू केलेला दिसून येत आहे. कारण पिता-पुत्राचे नाते असणे हा एक वेगळा भाग आहे. परंतु पित्याच्या कर्तृत्वाचा वारसा चालविण्या इतपत माजी आमदार नारायण पाटील यांनी कधीच हवी तशी झेप घेतली नाही. परंतु आज त्यांच्या राजकारणासाठी स्वर्गीय गोविंद बापू पाटील यांच्या नावाचा सर्रासपणे ते वापर करताना दिसत आहेत. आदिनाथ सहकारी साखर कारखाना आता सुरू होतोय हि आनंदाची गोष्ट आहे. त्यामध्ये आम्ही सुद्धा एक लाख रुपये अनामत रक्कम देण्यासाठी तयार आहोत. परंतु संचालक मंडळांनी अद्याप पर्यंत त्यांची कोणतीही भूमिका स्पष्ट केलेली नाही. सौ. रश्मी बागल-कोलते यांनी फक्त कारखाना स्थळावर भेट दिली आहे. भेट दिल्याने कोणतेही प्रश्न सुटत नाहीत. परंतु कामगारांच्या सुख-दुःखामध्ये जर तुम्ही संचालक मंडळाच्या सर्वेसर्वा म्हणून प्रत्येक वेळी उभा राहिला असता, तर आवश्यच त्यांच्या जगण्यातले दुःख काही प्रमाणात का असेना कमी झाले असते. ज्याप्रमाणे माजी आमदार नारायण पाटील यांनी चालू असलेल्या कारखान्यातून मधूनच पळ काढला. त्याप्रमाणेच तुम्ही सुद्धा तुमच्या राजकारणासाठी, आता कुठे कारखान्याकडे फिरकत आहात. अन्यथा तुम्हालाही या गोष्टीचे काही घेणे-देणे नव्हते हे सर्व जगजाहीर आहे. तुमचे बोलणे म्हणजेच "पोकळ वसा" अशा प्रकारचेच आहे. तरी माजी आमदार नारायण पाटील व सौ. रश्मी बागल-कोलते यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन कारखान्याविषयी उद्भवणाऱ्या किंवा कारखान्याच्या वाटचालीविषयी संयुक्तपणे शेतकरी, सभासदांना व तालुक्यातील जनतेला उत्तरे द्यावीत. जेणेकरून तुम्ही कारखान्या बाबतीत राजकारण करत आहात, की खरंच तुम्हाला तालुक्यातील शेतकऱ्यांचा कळवळा येतोय. हे तालुक्यातील नव्हे तर जिल्ह्यातील जनतेला कळून येईल.
कासखान्याच्या नावाखाली संचालक मंडळातील कोणत्या संचालकांने ICICI बँकेतुन लाखो रुपयांचे कर्ज उचलले. ते सुध्दा रश्मी बागल यांनी जाहीर करावे. कारखान्यातील करोडो रुपयांचे सामान चोरुन विकुन सुध्दा जर या ढेकणांचे पोट भरत नसेल, तर अशा नालायकांना काय बोलावे. त्याचप्रमाणे कारखान्या बाबतीतले टेंडर हे सर्वांसमक्ष संचालक मंडळाने कारखाना स्थळावर उघड करावे. कोणाच्या बंगल्यावर अथवा कुठल्या शेडवर कारखान्या बाबतीतले इथून पुढे तरी निर्णय होऊ नयेत. नाहीतर "पहिले पाढे पंचावन्न" असा काहीसा प्रकार व्हायचा....
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.
शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा
श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.
श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.
श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका
श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर
वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार
विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे
सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता
श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न
अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात
दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील
महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.
दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.
सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन
अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद