यवत ग्रामीण रुग्णालयात आरोग्य शिबीर, माता सुरक्षित तर घर सुरक्षित, शासनाचा उपक्रम, सरपंच समीर दोरगे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न

By : Polticalface Team ,Fri Sep 30 2022 10:48:14 GMT+0530 (India Standard Time)

यवत ग्रामीण रुग्णालयात आरोग्य शिबीर, माता सुरक्षित तर घर सुरक्षित, शासनाचा उपक्रम, सरपंच समीर दोरगे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड, दौंड - ता ३०/०९/२०२२, यवत ग्रामीण रुग्णालयात राज्य शासनाच्या वतीने लोक कल्याणकारी योजनेचा प्रारंभ दि २६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर २०२२ पर्यंत महाराष्ट्रातील सर्व ग्रामीण आरोग्य विभागात, नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने दि २६ रोजी यवत ग्रामीण रुग्णालयात सर्व माता भगिनींसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन विद्यमान सरपंच समीर दोरगे यांच्या हस्ते करुन आरोग्य तपासणी शिबिराची सुरुवात करण्यात आली, या प्रसंगी यवत ग्रामीण रुग्णालयाचे प्रमुख आरोग्य अधिकारी डॉ ईरवाडकर, तसेच यवत ग्रामपंचायत ग्राम विकास अधिकारी बबन चखाले व सर्व डॉक्टर्स नर्स कर्मचारी आशा स्वयंसेविका आणि ग्रामीण भागातील महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते, या प्रसंगी बोलताना म्हणाले, शासनाच्या या आरोग्य शिबिराच्या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील माता सुरक्षित तर घर सुरक्षित महत्वपूर्ण निर्णयाचे विद्यमान सरपंच समीर दोरगे यांनी स्वागत केले, नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने शासनाने राज्यातील माता भगिनींसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे पुढील ५ ऑक्टोबर पर्यंत ग्रामीण रुग्णालयाचे प्रमुख डॉ ईरवाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व स्टाफ डॉक्टर नर्स आशा स्वयंसेविका सफाई कामगार, हे रुग्ण सेवा करण्याचे महान कार्य करत आहेत, त्याबद्दल सरपंच समीर दोरगे यांनी त्यांचे मनापासून आभार व्यक्त केले, यवत ग्रामीण रुग्णालयत रुग्ण कल्याण समिती सदस्य व यवत ग्रामपंचायत विद्यमान सदस्य मा.उपसरपंच सदानंद दोरगे यांच्या हस्ते दुसऱ्या दिवशी फित कापून सुरूवात करण्यात आली. यावेळी बोलताना रुग्णालयाचे प्रमुख डॉ. ईरवाडकर यांनी दि २६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर पर्यंत संपूर्ण कार्यक्रमाची माहिती या वेळी उपस्थित महिला भगिनींना दिली. यवत पंचक्रोशीतील सर्व माता भगिनीना आरोग्य संदर्भात मोलाचे मार्गदर्शन केले, माता सुरक्षित तर घर सुरक्षित या ब्रीद वाक्याचे महत्व डॉ ईरवाडकर यांनी पटवून दिले, नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने राज्य शासनाने माता-भगिनींसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर ५ ऑक्टोबर पर्यंत हा कार्यक्रम राबवण्याचा संकल्प केला आहे, या शिबिरामध्ये मोफत आरोग्य तपासणी करण्यात येणार असून, येत्या दोन-तीन दिवसांमध्ये मुख्य शिबिराची तारीख घोषित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले, या शिबिरामध्ये तज्ञ डॉक्टरांकडून माता-भगिनीं महिलांच्या आरोग्याची काळजी घेऊन विविध आजारावरती तपासण्या व लहान मोठ्या शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले, यवत पंचक्रोशीतील सर्व महिला भगिनींनी ह्या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन, यवत ग्रामीण रुग्णालयाचे प्रमुख डॉ. ईरवाडकर यांनी केले आहे, या वेळी रुग्णालयातील डाॅ.गरड, खराडे सिस्टर ,भानुसे सिस्टर, बागवान मॅडम आढाव मॅडम ,वरवंडकर मॅडम, डॉ तावरे, पवार मावशी, प्रामुख्याने उपस्थित होते, तसेच यवत विकास सोसायटीचे मा. चेअरमन विद्यमान संचालक आण्णा दोरगे, राहुल घेवरे, शहाणे, स्वामी, संतोष जावळे व यवत परीसरातील माता भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.

शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा

श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.

श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.

श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका

श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर

वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार

विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे

सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता

श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न

अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात

दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील

महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.

दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.

सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन

अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद