By : Polticalface Team ,Fri Sep 30 2022 22:59:25 GMT+0530 (India Standard Time)
सामाजिक कार्यकर्ते तथा राष्ट्रीय छावा संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष सन्माननीय गंगाधर काळकुटे यांच्या माध्यमातून सतत सात वर्षे दिल्ली येथे रेल्वे मंत्रालय आणि जंतर-मंतर परिसरामध्ये आंदोलन केली यामध्ये मीही रेल्वे आंदोलनासाठी दिल्ली येथे गेलो होतो तेव्हा सहा तासाचं जेल सुद्धा झालं होतं स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या मध्यस्थीने सर्व आंदोलनकर्त्यांना जामीन मिळाला होता अशा पद्धतीने वेळप्रसंगी जेल भोगणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलून ज्यांचा रेल्वेसाठी काहीच हातभार लावला नाही अशा लोकांना विशेष निमंत्रण देऊन त्या ठिकाणी उद्घाटन केलं गेलं हे जाणून-बुजून सामाजिक कार्यकर्त्यांना कमी लेखण्याचं षडयंत्र ज्यांनी रचल त्यांची मानसिकता विकृत असुन आता उद्घाटन केलंच आहे तर कमीत कमी रेल्वेसाठी वेळोवेळी लढा उभा करणारे मग ते स्वर्गीय अमोलभैया गलधर यांच्यापासून ते आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांची नामसूचीफलक बीड रेल्वे स्टेशन वर लावावीत असा सल्ला यावेळी डॉ जितीन दादा वंजारे खालापूरीकर यांनी दिला. तसेच बीड रेल्वे स्थानकाला स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांचं नाव द्यावं आणि रेल्वस्थानकापासून बीड बस स्थानकापर्यंत च्या रोड ला स्वर्गीय अमोल भैया गलधर यांचं नाव द्यावं अशी अपेक्षा बीड रेल्वे आंदोलक तथा सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी व्यक्त केली. वाचक क्रमांक :