By : Polticalface Team ,Sat Oct 01 2022 09:55:17 GMT+0530 (India Standard Time)
या भागातील दोन बोटी भरकटल्यानं पाकिस्तान हद्दीत गेल्या आहे. या बोटींवरील एकूण सोळा मच्छीमार खलाशी मजूरांना पाकिस्तान सैनिकांनी अटक केल्याची माहिती मिळत आहे. यामधील सात खलाशी मच्छीमार कामगार पालघर जिल्ह्यातील आहेत. त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू असल्याची माहितीही पालघरमधील मच्छिमार संघटनेनं दिली आहे. डहाणू आणि तलासरी तालुक्यातील बोर्डी जवळील एका गावातील हे मच्छीमार खलाशी कामगार आहेत.
खोल समुद्रात मासेमारी करताना भरकटलेल्या दोन बोटींना पाकिस्ताननं ताब्यात घेतले आहे. या बोटीवरील एकूण 16 जण सध्या पाकिस्तानच्या ताब्यात आहेत. या सर्वांना पाकिस्तान मेरिटाईम सिक्युरिटी एजन्सीनं ताब्यात घेतलं आहे. गुजरातमधील ओखा येथील मत्स्यगंधा आणि अन्य एक मच्छीमार बोट मासेमारीसाठी गेली होती. यासंदर्भातील माहिती पाकिस्तान-इंडिया पीपल्स फॉर्म फॉर पीस अॅन्ड डेमोक्रॅसी संस्थेचे माजी सचिव जतिन देसाई यांनी दिली आहे.
पालघरमधील 7 खलाशांची नावं : 1) नवशा महाद्या भिमरा 2) सरित उंबरसाडा 3) विजय नागवंशी 4) जयराम ठाकर 5) उमजी पाडवी 6) विनोद कोल 7) कृष्णा बुजड वाचक क्रमांक :