By : Polticalface Team ,Sat Oct 01 2022 19:22:50 GMT+0530 (India Standard Time)
पोलीस स्टेशनला याबाबत फोन आल्याने तात्काळ पो. उप. निरी.अभंग व डी.बी. स्टाफ पोलीस गाडीसह घटणास्थळी पोहोचले. गाडीची पहाणी केली असता गाडीला मागे व पुढे नंबर प्लेट नव्हती . त्याचप्रमाणे गाडीचे डॅशबोर्डवर महाराष्ट्र शासन असे लिहीलेली पाटी मिळुन आली . गाडीमध्ये आणखी 3 नंबर प्लेट मिळाल्या गाडीमध्ये गाडी चालक व त्याचा साथीदार यांना ताब्यात घेतले . दोघेही दारु पिलेले होते . आरोपीतांना पोलीस स्टेशनला आणुन सविस्तर चौकशी केली असता त्यांनी त्यांची नावे 1 ) हरिभाऊ दत्तु वाळुंज , रा . पिंपळगाव तुर्क , ता . पारनेर , जिल्हा- अहमदनगर , ( चालक ) , 2 ) नासीर गुलाब पठाण , रा . काष्टी , ता . श्रीगोंदा , जिल्हा अहमदनगर असे सांगितले .
आरोपी यांना गुन्ह्यात अटक करुन पोलीस कस्टडी रिमांड घेतला . आरोपीतांकडे कसुन चौकशी केली . अजनुज चौकात ज्या ठिकाणाहुन एक वयस्कर इसम , एक कॉलेजचा विद्यार्थी व शाळेतील मुलगा समर्थ हा वर नमुद गाडीत बसले त्याठिकाणी आरोपी नासिर याने हातगाड्यावरुन सफरचंद विकत घेतले , शेजारच्या पाणटपरीवरुन सौंफ घेतली . त्यांना बोलावुन त्यांचेकडे चौकशी केली असता त्यांनी सांगितले . पांढ -या रंगाची स्वीफ्ट गाडी नंबर नसलेली अजनुज चौकात आली असता एक वयस्कर इसम व शाळेतील मुलगा यांनी हात देवून त्यांना थांबविले. गाडी थांबली असता गाडीतील काष्टी येथे राहाणार नासीर याने चौकात सफरचंद व पानटपरीतुन सौफ विकत घेतली . त्यावेळी एक वयस्कर इसम, एक तरुण , व शाळेतील एक मुलगा त्या गाडीत बसले व गाडी पुढे आनंदवाडीकडे गेली असे सांगितले . गाडीतील वयस्कर इसम व तरुण मुलगा यांचेकडे नासीर याने गाडीभाडे म्हणुन दोघांकडुन प्रत्येकी 10,10 रुपये घेतले . शाळेतील मुलगा समर्थ याचेकडे भाडे म्हणुन 10 / - रु . मागितले त्याने माझेकडे पैसे नाही असे सांगितले . गाडीचा चालक हरिभाऊ वाळूंज याने तु आम्हाला 10 / - रु नाही दिले तर तुला आम्ही श्रीगोंदाकडे घेवून जावु असे समर्थ यास म्हटल्याने घाबरुन जावुन त्याने आरडाओरड केली . रस्त्याने जाणा -या वाहनचालकाने ऐकल्याने त्याने गाडीचा पाठलाग केला. अशोक बाघमोडे यांचे घरासमोर चालक हरिभाऊ याने गाडी उभी करुन मुलगा समर्थ यास गाडीतुन उतरुन दिले .
अशोक वाघमोडे हे समर्थच्या वडीलांच्या ओळखीचे असल्याने तो त्यांचेकडे गेला व त्यांचे मोबाईलवरुन वडीलांना फोन केला व वर नमुद हकीकत वडीलांना सांगितली . तपासामध्ये मुलगा समर्थ याने त्याला गाडीतील चालक हरिभाऊ याने चाकु लावून धमकाविले व तुझ्या किडण्या काढुन विकणार आहे असे चुकीचे सांगितल्याचे दिसुन येते . गाडीतील दोन्ही आरोपीतांकडे कसुन चौकशी केली असता त्यांनी गुन्हा घडल्याचे दिवशी सकाळी जयश्री हॉटेल , काष्टी समोर गाडीच्या दोन्ही नंबरप्लेट काढल्या . सदर गाडीचे मालक अक्षय अंकुश थोरात , रा . वाबळेवाडी , शिक्रापुर , जिल्हा पुणे यांचे नातेवाईक काष्टी परिसरात राहातात . काष्टी येथे आला असता चालक हरिभाऊ दारु पिलेला होता हे गाडी मालक यांना माहीती होवु नये म्हणुन त्याने गाडीच्या दोन्ही नंबर प्लेट काढुन टाकल्या होत्या . गाडी सीएनजी असल्याने श्रीगोंदा येथे सीएनजी गॅस भरण्यासाठी गाडी चालक गाडी घेवुन आलेला होता . काष्टी येथुन नासीर त्याचेसोबत गाडीत बसलेला होता . अजनुज चौकात त्यांनी श्रीगोंदा कडे जाणारा रोड आहे असे समजुन गाडी टर्न केली . गुगलवर श्रीगोंदाकडे जाणारा रोड त्यांना आनंदवाडी मार्गे दाखविला त्यामुळे त्यांनी आनंदवाडी रोडने गाडी श्रीगोंदा कडे येण्याकरिता घेतली . दोन्ही आरोपी दारु पिलेले होते .
गाडीला मागे व पुढे नंबरप्लेट नव्हती व डॅशबोर्डवर महाराष्ट्र शासन असे लिहीलेले असल्याने नागरिकांमध्ये गाडी व गाडीतील दोन्ही आरोपीतांबाबत संशय निर्माण झाला . त्यामुळे त्यांनी गाडी रस्त्यात अडवुन गाडीच्या काचा फोडुन दोन्ही आरोपीतांना किरकोळ स्वरुपाची मारहान केली . गाडी चालक हरिभाऊ याचे फिर्यादीवरुन श्रीगोंदा पोलीस स्टेशनला गु.र.नं. 747/2022 भा.दं.वि.क . 341 , 323,427,143,147 प्रमाणे गुन्हा अज्ञान 5 ते 6 इसमांचे विरुध्द गुन्हा दाखल केला आहे . पोलीस अधिकारी कर्मचारी पोलीस गाडीसह वेळेवर घटणास्थळी पोहोचले त्यामुळे पुढील अनर्थ टळला . फिर्यादी , मुलगा समर्थ , त्याचे सोबत गाडीत बसलेले दोन इसम , अजनुज चौक , काष्टी , खरातवाडी व आनंदवाडी येथील घटणा पहाणारे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांचेकडे फिर्यादीत नमुद घटणेच्या अनुशंगाने सखोल चौकशी केली आहे . दोन्ही आरोपीतांकडे कसुन चौकशी केली . आरोपी हरिभाऊ वाळुंज व नासीर पठाण यांनी महाराष्ट्र शासनाचे नोकरीत नसताना महाराष्ट्र शासन अशी पाटी खाजगी गाडीला लावुन शासनाची फसवणुक केली . त्याचप्रमाणे गाडीला मागे व पुढे नंबरप्लेट लावलेली नव्हती . दोन्ही आरोपी हे दारु पिलेले होते . त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली . शाळेच्या मुलाकडे भाडे म्हणुन 10 / - रु . ची मागणी करुन त्याला पैसे न दिल्यास श्रीगोंदा येथे घेवून जावु असे धमकाविले . शाळेतील मुलाला किडनॅप करुन पळवुन नेत असल्याचे तपासात निष्पन्न झालेले नाही . असे तपासामध्ये निष्पन्न झाले आहे . आरोपींविरुध्द विरुध्द भा.दं.वि. क . 420 , मुंबई दारुबंदी कायदा 185 , मोटार वाहन कायदा कलम 50/177 अन्वये मा . न्यायालयात तपासाअंती दोषारोप पत्र दाखल करणार आहोत . सदर घटणेबाबत गुन्हा दाखल होण्यापुर्वीच वर्तमानपत्र , युट्युब चॅनेल व सोशल मिडीया यावरुन शाळेतील मुलांना पळविणारी टोळी पकडली अशा स्वरुपाची माहीती प्रसारीत झाल्याने परिसरातील नागरिक , मुलांचे पालक यांचेमध्ये घबराहट निर्माण झाली होती . सर्व नागरिकांना व शाळेतील मुलांच्या पालकांना सुचीत करण्यात येते की , शाळेतील मुलांना पळविणारी टोळी पकडलेली नाही . शाळेतील मुले पळविणारी कोणतीही टोळी परिसरात सक्रीय नाही . नागरिक व पालकांनी घाबरुन जावु नये , शाळा , कॉलेज व परिसरात कोणतेही संशयीत वाहन अथवा इसम फिरताना आढळल्यास तात्काळ पोलीस स्टेशनला संपर्क करावा . सदर गुन्ह्याचा तपास मा . मनोज पाटील , पोलीस अधीक्षक , अहमदनगर , मा . सौरभ कुमार अग्रवाल , अपर पोलीस अधीक्षक , अहमदनगर , मा . अण्णासाहेब जाधव , उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत विभाग यांचे मार्गदर्शनाखाली रामराव ढिकले , पोलीस निरीक्षक , समीर अभंग , पो.उप.निरी व श्रीगोंदा गुन्हे शोध पथकाचे अंमलदार हे करित आहे. वाचक क्रमांक :